शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमी करणार ‘स्वाईन फ्लू’वर जनजागृती

By admin | Updated: February 22, 2015 01:36 IST

स्वाईन फ्लूच्या वाढत्या प्रभावामुळे त्याला आळा घालण्यासाठी मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमीतर्फे एक पाऊल पुढे टाकून स्वाईन फ्लूवर जनजागृती कार्यक्रम सुरू केला आहे.

गोंदिया : स्वाईन फ्लूच्या वाढत्या प्रभावामुळे त्याला आळा घालण्यासाठी मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमीतर्फे एक पाऊल पुढे टाकून स्वाईन फ्लूवर जनजागृती कार्यक्रम सुरू केला आहे. संशयित रुग्णांना नजीकच्या ग्रामीण आरोग्य रुग्णालयात संपर्क साधण्यासाठी प्रवृत्त केले जात आहेत. स्वाईन फ्लूच्या जनजागृतीसाठी मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमीतर्फे जनजागृती कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटक जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, अध्यक्षस्थानी देवेंद्रनाथ चौबे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवि धकाते, डॉ. घनशाम तुरकर, विनोद हरिणखेडे, डॉ. विद्यासागर मोहन, धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंजन नायडू, नमाद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. योगेश नासरे, डॉ. येलन, अशोक शहारे, चंद्रकांत खंडेलवाल, मोहन पटले, कुलदीप रिनाईत उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवि धकाते यांनी स्वाईन फ्लूची माहिती देत या आजारावर उपचार करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे सांगितले. आजारावर लागणारी औषधी आमच्याकडे उपलब्ध असल्याचे सांगितले. स्वाईन फ्लूचे लक्षणे आढळताच रुग्णांनी नजीकच्या ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. डॉ. घनश्याम तुरकर यांनी आजाराला न घाबरता डॉक्टरचा सल्ला घेण्याचे आवाहन केले. काही लोक या आजाराच्या भितीमुळे माक्स व व्हेक्सिनचा काळाबाजार करतात. याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. डॉ. येलन यांनी या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणेला भेटी देण्याचे सांगत छोटाशा सर्दी, ताप व डायरियाला न घाबरता आपले हात वेळोवेळी धुण्याचे आवाहन केले. उष्ण तापमानामुळे या आजाराचे विषाणू नष्ट होतात अशीही माहिती दिली. कार्यक्रमाची सुरुवात मनोहरभाई पटेल यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर यांनी विद्यार्थ्यांना समाज जागृतीचे दूत असे संबोधून या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक असलेली माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे उत्तम माध्यम म्हणजे विद्यार्थी वर्ग असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात देवेंद्रनाथ चौबे यांनी मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमीतर्फे करण्यात येणाऱ्या कार्याची माहिती देत खा. प्रफुल्ल पटेल व अध्यक्षा वर्षा पटेल यांच्या मार्गदर्शनात हे कार्य करण्यात येत आहे, असे सांगितले.विनोद हरिणखेडे व अशोक शहारे यांनी आ. राजेंद्र जैन यांच्या सुचनेनुसार स्वाईन फ्लू जनजागृती कार्यक्रम आयोजित केल्याचे सांगितले. कार्यक्रमाला गोंदिया शहरातील नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी अ‍ॅकेडमीच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)