शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

करा एकच निर्धार, आयुष्यात नको क्षयाचा आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 10:44 IST

गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत ११८५ क्षय रूग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने मुलांची आरोग्य तपासणी सुरू केली आहे.

ठळक मुद्दे गोंदिया जिल्ह्यात ११८५ क्षयरोगाचे रूग्ण

नरेश रहिलेलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: क्षयरोग आणि कोरोना विषाणू हा फुफ्फसावर अनिष्ट परिणाम करीत असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी क्षयरूग्णांची कोरोना चाचणी करण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य विभागाने दिल्या आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ११८५ क्षय रूग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने मुलांची आरोग्य तपासणी सुरू केली आहे. मायक्रोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस (टीबी) नावाच्या जीवाणूमुळे होणारा आजार आहे. हा मुख्यत्वे फुफ्फसाचा आजार असून रोग प्रतिकार शक्ती कमी असलेल्या व कुपोषित व्यक्तींना होण्याची जास्त शक्यता असते.कोरोना व क्षयरोगएक क्षयरोगी १० ते १५ व्यक्तीपर्यंत हा आजार पसरवू शकतो. आजार होण्यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. जगभरात कहर करणारा कोरोना साथरोग व एड्ससारखे मोठे आजार थांबविण्यासाठी रुग्णावर उपचार करणे गरजेचे आहे. क्षयरोगाचा सांसर्गिक रूग्ण ज्याने परिणामकारक व संपूर्ण उपचार घेतला नाही,अशांसाठी जीवाणूचा स्त्रोत ठरतो.असा होतो क्षयरोगज्यावेळी क्षयरोगाचा जीवाणू श्वासावाटे फुफ्फसात प्रवेश करतो. काही दिवसांनी लक्षणे दिसल्यास त्याला फुफ्फसाचा क्षयरोग म्हणतात. काही रूग्णांमध्ये या जीवाणूंचा मेंदू मूत्रपिंड हाडे त्वचेपर्यंत प्रसार होऊ शकतो. मुले व एचआयव्हीग्रस्तांना क्षयरोग हा अत्यंत गंभीर ठरतो. क्षयरोगाचा संसर्गजन्य असून खोकणे व थुंकीदिवारे जीवाणू बाहेर टाकतो. हे जिवाणू हवेमध्ये पसरतात.काही काळ जिवंत राहून निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी दिली.क्षयरोग दुरूस्ती ९० टक्केराष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्र मांतर्गत तपासणी व इतर आधुनिक चाचण्यांद्वारे क्षयाचे निदान झाल्यानंतर औषधी पॅकमध्ये दिली जाते. याचा उपचार आरोग्य सेवकाच्या देखरेखीखाली केला जातो. नियमित औषधे घेतल्यानंतर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्के आहे.क्षयरोग ही भारतातील एक प्रमुख सार्वजनिक आरोग्य समस्या आहे.देशात दररोज पाच हजार व्यक्तींना नव्याने क्षयरोग होतो. दररोज एक हजार व्यक्ती क्षयरोगाने मृत्यूमुखी पडतात.डॉट्स उपचार, टीबीपासून मुक्तीकडेसंशयीत व दोन आठवड्यांपेक्षा जास्त दिवस खोकला असणाºया व्यक्तींची थुंकी सुक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासून आजाराचे निदान केले जाते. काही रूग्णांमध्ये क्ष-किरण तपासणी, प्रयोगशाळेत तपासणी व इतर आधुनिक चाचणीद्वारे करता येते. राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत मुलांना व प्रौढ व्यक्तींना रूग्णनिहाय औषधी पॅकमध्ये उपलब्ध आहे. क्षयरोगाचा उपचार हा वेगवेगळ्या श्रेणीत उपलब्ध आहे. क्षयरोगाचा उपचार आरोग्य कार्यकर्त्यांच्या समक्ष देखरेखीखाली केला जातो. त्याला डॉट्स पद्धत म्हटले जाते.क्षयरोगाची लक्षणेदोन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला, वजन कमी होणे, छातीत दुखने, दम लागणे, ताप येणे विशेषत: रात्री, भूक कमी लागणे, खोकतांना थुंकी वाटे रक्त पडणे ही क्षयरोगाची लक्षणे आहेत.क्षयरोग झालेल्या किंवा क्षयरोगाचे निदान झालेल्या रूग्णांना कोरोनाची बाधा होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे हायरिक्समध्ये येणाºया रूग्णांचे उपचाराकडे आरोग्य प्रशासनाकडून विशेष लक्ष दिले जात आहे. त्यांची तपासणी सुरू आहे._ डॉ.रा.ज.पराडकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी गोंदिया.

टॅग्स :Healthआरोग्य