शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्येही ४६५ वाहन चालकांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 05:00 IST

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी २२ मार्चला जनतेचा लॉकडाऊन करण्यात आला. परंतु २३ मार्चपासून केंद्र व राज्यसरकाने कोरोनाशी निपटण्यासाठी लॉकडाऊन केला आहे.त्या लॉकडाऊनमध्येही लोक विनाकारण रस्त्यावर येत असल्यामुळे त्यांच्यावर वाहतूक नियमान्वये कारवाई करून दंड वसूल करण्याची जोरदार मोहीम जिल्हा वाहतूक शाखेने चालविली आहे.

ठळक मुद्देरस्त्यावर आल्यास खबरदार : एक लाखाच्या घरात दंड वसूल, वाहतूक नियंत्रण विभागाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कारोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला तरीही लोक विनाकारण रस्त्यावर येत असल्याने गोंदिया जिल्हा वाहतूक पोलिसांनी २३ मार्च ते २ एप्रिलच्या दुपारपर्यंत ४६५ वाहन चालकांना दंड आकारून त्यांच्याकडून एक लाख रूपयाच्या घरात दंड ठोठावून वसुलही केला आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी २२ मार्चला जनतेचा लॉकडाऊन करण्यात आला. परंतु २३ मार्चपासून केंद्र व राज्यसरकाने कोरोनाशी निपटण्यासाठी लॉकडाऊन केला आहे.त्या लॉकडाऊनमध्येही लोक विनाकारण रस्त्यावर येत असल्यामुळे त्यांच्यावर वाहतूक नियमान्वये कारवाई करून दंड वसूल करण्याची जोरदार मोहीम जिल्हा वाहतूक शाखेने चालविली आहे. विनाकारण रस्त्यावर येणाऱ्या अश्या ४६५ लोकांना २३ मार्च ते १ एप्रिल या दहा दिवसात दंड करण्यात आला आहे.चारचाकी किंवा दुचाकी वाहन चालक रस्त्यावर फिरू नयेत म्हणून पोलिसांनी कायद्याची कडक अमंलबजावणी सुरू केली आहे. कारण नसताना एखादा व्यक्ती रस्त्यावर आढळला. पोलिसांना समाधानकारक उत्तरे न मिळाल्यास त्या वाहन चालकाला थांबवून त्याच्या वाहनात किंवा वाहन चालवितांना कोणत्या-ना कोणत्या तृट्या दाखवून पोलीस कारवाई करीत आहेत. लॉकडाऊनमुळे वाहतूक पोलीस आणखीच कडक नियम लावून कारवाई करीत आहे. हे कडक नियम कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उचललेले योग्य पाऊल आहे.२३ मार्चपासून कारवाई करण्याचा सपाटा लावला त्यात दुचाकी, चारचाकी अशा ४६५ वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ९७ हजार ६०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. लॉकडाऊनचे पालन व्हावे हा एकमेव या मागचा उद्देश आहे. रस्त्यावरून येणाºया-जाणाºया प्रत्येक वाहनाची कसून चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे. कारण नसताना वाहन रस्त्यावर आले की त्या वाहनाला दंड कसा करायचा याच्याच प्रयत्नात वाहतूक पोलीस दिसत आहेत. हे जरी वाहन चालकांना योग्य वाटत नसले तरी आजघडीला वाहतूक पोलिसांकडून करण्यात येणारी ही कारवाई समाजाच्या हिताची आहे. दंडामुळे विनाकारण लोक रस्त्यावर येणार नाहीत आणि कोरोनाच्या लढाईत सर्व जिंकतील हा या मागचा उद्देश आहे.विनाकारण कुणीही घराबाहेर पडू नये. वाहन रस्त्यावर आले तर चौकशी होणारच. कारण नसताना वाहन चालक रस्त्यावर आला तर त्याच्यावर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करणे अटळ आहे.- दिनेश तायडेपोलीस निरीक्षक वाहतूक शाखा गोंदिया.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याtraffic policeवाहतूक पोलीस