शुल्क वाढ न करण्याचे जिल्ह्यातील २३६ शाळांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 05:00 AM2020-06-06T05:00:00+5:302020-06-06T05:00:31+5:30

लॉकडाऊनच्या कालावधीत गैरसोय टाळण्यासाठी पालकांना ऑनलाईन शुल्क भरण्याचा पर्याय द्यावा, असे गटशिक्षणाधिकारी शाळांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्यामुळे सगळीकडे आर्थिक चणचण निर्माण झाली आहे. त्यासाठी शासनाने शैक्षणिक सत्र २०२०-२१ या वर्षात ही वाढ करण्यात येऊ नये, तसेच शुल्क भरण्याकरिता शाळांनी पालकांवर दबाव आणू नये.

Letter to 236 schools in the district not to increase fees | शुल्क वाढ न करण्याचे जिल्ह्यातील २३६ शाळांना पत्र

शुल्क वाढ न करण्याचे जिल्ह्यातील २३६ शाळांना पत्र

Next
ठळक मुद्देखासगी विनाअनुदानित शाळांवर करडी नजर : जि.प.शिक्षण विभागाचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शिक्षण विभागाने २० मे रोजी एक पत्र काढून जिल्ह्यातील शाळांना शैक्षणिक शुल्का संदर्भात आदेश काढले आहे. त्यात सन २०२०-२१ या शैक्षणिक सत्रात कोणत्याही प्रकारची शुल्क वाढ शाळांनी करू नये असे निर्देश शाळांना दिले आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी जर काही शैक्षणिक सुविधांचा वापर करावा लागला नाही आणि याबाबत खर्च कमी होणार असल्यास पालकांचे कार्यकारी समितीमध्ये हे ठराव करून त्याप्रमाणे योग्य प्रमाणात शुल्क कमी करावे अशी सूचना सर्व शाळांना केली आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीत गैरसोय टाळण्यासाठी पालकांना ऑनलाईन शुल्क भरण्याचा पर्याय द्यावा, असे गटशिक्षणाधिकारी शाळांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्यामुळे सगळीकडे आर्थिक चणचण निर्माण झाली आहे. त्यासाठी शासनाने शैक्षणिक सत्र २०२०-२१ या वर्षात ही वाढ करण्यात येऊ नये, तसेच शुल्क भरण्याकरिता शाळांनी पालकांवर दबाव आणू नये.
महाराष्ट्र शासनाने ८ मे रोजी महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थामध्ये सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरिता शुल्क वाढ करू नये यासंदर्भात एक पत्र काढलेले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणू या आजाराला जागतिक महामारी म्हणून घोषित केले आहे.
या आजाराच्या संसर्गाचा प्रतिबंध व नियंत्रणासाठी राज्यात साथरोग अधिनियम १९९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ ची अंमलबजावणी राज्यात सुरू आहे. सद्या राज्यात लॉकडाऊन सुरू असताना काही शाळा, संस्था विद्यार्थ्यांना व पालकांना शाळेचे शुल्क भरण्याची सक्ती करीत असल्याच्या अनेक तक्रारी शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी विद्यार्थी व पालकांकडून शाळेची चालू वर्षाची व आगामी वर्षाचे शुल्क जमा करण्यासंदर्भात सक्ती करू नये असे निर्देश दिले आहे.

लॉकडाऊन कालावधी संपल्यानंतर शुल्क जमा करा
कोरोनाचा प्रादुर्भावामुळे अद्यापही लॉकडाऊन सुरूच आहे.त्यामुळे लॉकडाऊन संपल्यानंतर शुल्क जमा करण्याच्या सूचना पालक आणि शाळांना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र शैक्षणिक संस्था विनिमय अधिनियम २०११ मधील कलम २१ अन्वये प्राप्त अधिकारान्वये तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये प्राप्त अधिकारान्वये शासन निर्णय काढण्यात आला आहे. सन २०१९-२० व २०२०-२१ मधील दिली जाणारी किंवा शिल्लक असणारे वार्षिक शुल्क एकदाच न घेता मासिक, त्रेमासिक जमा करण्याचा पर्याय देण्याच्या सूचना शासनाने केल्या आहे.
तर शुल्क ही करा कमी
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी कोणतेही शुल्क वाढवू नये, शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी जर काही ही शैक्षणिक सुविधांचा वापर करावा लागला नाही तर त्याबाबताचा खर्च कमी होणार असल्यास पालकांच्या कार्यकारी समितीमध्ये हे ठराव करून त्याप्रमाणे योग्य प्रमाणात शुल्क कमी करावे असे निर्देश दिले आहे. लॉकडाऊच्या कालावधीत गैरसोय टाळण्यासाठी पालकांनी ऑनलाईन शुल्क जमा करावा हा आदेश पूर्व प्राथमिक ते इयत्ता बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या सोयीने लागू राहणार आहे.

Web Title: Letter to 236 schools in the district not to increase fees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा