शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार अभियानाचा शुभारंभ

By admin | Updated: January 7, 2015 22:55 IST

सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत विस्तारित स्वरुपात समाधान शिबिर सोमवारी सडक अर्जुनी येथे पार पडले. सदर कार्यक्रमात सामाजिक न्यायमंत्री व पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते

गोंदिया : सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत विस्तारित स्वरुपात समाधान शिबिर सोमवारी सडक अर्जुनी येथे पार पडले. सदर कार्यक्रमात सामाजिक न्यायमंत्री व पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते जलयुक्त शिवार अभियानाचा शुभारंभ करुन विदर्भ सघन सिंचन कार्यक्रमामधील ठिंबक सिंचन संच पूर्व मंजुरीचे आदेश लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले.जलयुक्त शिवार अभियानाद्वारे विविध स्त्रोतांमध्ये साठवणूक होणाऱ्या पाणाचा वापर सुक्ष्म सिंचन पद्धतीने करावे व गरजेनुसारच पाण्याचा वापर करण्यात यावा. त्यामुळे कमी पाण्यात जास्त क्षेत्राचे सिंचन करता येईल. यामुळे पिकाची उत्पादकता वाढून जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास मदत होईल. याकरिता ठिंबक सिंचन पद्धतीचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अवलंब करावा, असे आवाहन ना. बडोले यांनी केले.ते पुढे म्हणाले, जलयुक्त शिवार अभियान २०१९ पर्यंत विविध प्रकारची जलसंधारणाची कामे एकात्मिक पद्धतीने राबवून ‘सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र’ याकरिता टंचाई परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने धाडसी निर्णय घेतला आहे. यामध्ये सर्व शेतकरी, शासकीय यंत्रणा, अशासकीय संस्था, जिल्ह्यातील कारखानदार यांनी योग्य ते सहकार्य करुन अभियान यशस्वीपणे राबविण्याचे सर्व उपस्थिताना आवाहन केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी जलयुक्त शिवार अभियानाचे उद्देश व यामध्ये घेण्यात येणाऱ्या कामांची व योजनांची माहिती दिली. कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी डी.डी. शिंदे, सभापती, उपसभापती पं.स. सडक/अर्जुनी, जि.प. व पं.स. सदस्य, सडक-अर्जुनीचे सरपंच, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील, उपविभागीय कृषी अधिकारी युवराज शहारे, देवरीचे उपविभागीय अधिकारी सोनवाने, सडक -अर्जुनीचे तहसीलदार उईके, गट विकास अधिकारी धांडे, तालुका कृषी अधिकारी विजय पेशट्टीवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)