शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाचे पुन्हा तांडव

By admin | Updated: March 29, 2016 03:02 IST

कमी पावसामुळे आणि कीडीच्या प्रादुर्भावामुळे आधीच शेतकऱ्यांना अपेक्षित आले नसल्यामुळे परिस्थिती नाजूक झाली

गोंदिया : कमी पावसामुळे आणि कीडीच्या प्रादुर्भावामुळे आधीच शेतकऱ्यांना अपेक्षित आले नसल्यामुळे परिस्थिती नाजूक झाली आहे. त्यात रबीच्या पिकाच्या आशेवरही अवकाळी पावसामुळे पाणी फेरले जात आहे. महिन्याभरात तिसऱ्यांदा झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लावला आहे. मार्च महिना संपण्याच्या मार्गावर आहे. सोबतच उष्णतेचा प्रभाव वाढत जात आहे. परंतु यावर्षी वारंवार अवकाळी पाऊस बरसत असल्यामुळे रबी पिकांचे मोठे नुकसान होत आहे. रबीच्या धानासह आंब्याचा मोहोर आणि भाजीपाल्याच्या पिकांनाही याचा फटका बसला आहे.रविवारी २७ मार्चच्या रात्री ७.१५ वाजताच्या दरम्यान अचानक तीव्र गतीने वादळी वारा सुरू झाला. काही वेळानंतर ढगांच्या मोठ्या गडगडाटासह रिमझिम पाऊस पडू लागला. त्यानंतर जोराम पाऊस सुरू झाला. थांबत थांबत हा पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता. माहितीनुसार २८ मार्चच्या पहाटे २.३० वाजतापर्यंत पाऊस व ढगांचा गडगडाट सुरू होता.शहरात सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार गोंदिया तालुक्यात ७४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. गोरेगाव तालुक्यात १०.२ मिमी, तिरोडा तालुक्यात ६६.७ मिमी, अर्जुनी-मोरगावमध्ये ७७.२ मिमी, देवरीमध्ये २५ मिमी, आमगावात २१.२ मिमी, सालेकसामध्ये २५.१ मिमी व सडक-अर्जुनी तालुक्यात ३४.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान रात्रभर विद्युतचा लपंडाव सुरू होता. अनेकांच्या घरी विद्युत पुरवठा खंडित झाल्याने त्यांना रात्रभर जागून काढावी लागली. तर अनेकांच्या घरातील फ्यूज उडाल्याने २८ मार्च रोजी दिवसासुद्धा नागरिकांना उष्णतेचा प्रकोप सहन करावा लागला. (प्रतिनिधी)तिरोड्यात वीज व पाणी पुरवठा ठप्प४रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह बरसलेल्या पावसाने अनेकांची झोप उडवून टाकली. अनेकांना रात्रभर अंधारात व डासांच्या त्रासात रात्र घालवावी लागली. काही ठिकाणी मध्यरात्री विजेचा पुरवठा सुरू झाला तर काही ठिकाणी अनेकांच्या घरी अंधारच होता. सोमवारी अनेक नागरिकांनी वीज कार्यालय गाठून तक्रारी नोंदविल्या. मात्र वीज कर्मचारी नागरिकांच्या घरी पोहोचलेच नाही. त्यामुळे तिरोडा शहरातील अनेक कुटुंब सोमवारची रात्रसुद्धा अंधारात व डासांच्या त्रासातच घालवतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकाराकडे लक्ष घालून नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करावे, अशी तिरोडावासीयांची मागणी आहे. तसेच वीज पुरवठा खंडित असल्याने तिरोडावासीयांना सोमवारी सकाळी पाण्याचा पुरवठा होवू शकला नाही.विद्युत पुरवठा खंडिततीव्र वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला. काही ठिकाणी तार तुटले आहेत. तार तुटल्यामुळे विद्युत व्यवस्था पार कोलमडली व नागरिकांना रात्रभर विनाविजेनेच राहावे लागले. काही ठिकाणी विद्युत व्यवस्था २८ मार्चच्या सकाळीसुद्धा पूर्ववत झाली नाही. विद्युत व्यवस्था ठप्प पडल्यामुळे शहरातील काही भागात भारत-आॅस्ट्रेलिया दरम्यान क्रिकेट मॅच बघण्यापासून नागरिक वंचित झाले. पाणी पुरवठासुद्धा प्रभावितवादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या. तार टुटल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या टाक्यांपर्यंत पाणी पोहचू शकले नाही. त्यामुळे टाक्या रिक्त राहिल्या व याचा सरळ प्रभाव पाणी पुरवठ्यावर झाला. २८ मार्चच्या सकाळी शहरातील अनेक भागात पाणी पुरवठा झाला नाही. त्यामुळे शहरातील नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी मात्र आपले अंग काढून घेतले.