शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पाच दिवसात वाढले रुग्ण बरे होण्याचे प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 05:00 IST

ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच कोरोना बाधितांच्या संख्येत घट होण्यास सुरूवात झाली तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिलासादायक चित्र आहे.मागील पाच दिवसात ११७९ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली. तर ५४१ नवीन बाधितांची भर पडली.

ठळक मुद्दे११७९ बाधितांची कोरोनावर मात : ५४१ नवीन रुग्ण : ८ बाधितांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर ऑक्टोंबरमध्ये कोरोना रुग्ण वाढीचा दर कायम राहणार का अशी चिंता शहरवासीयांना सतावित होती. मात्र ऑक्टोंबर महिन्याच्या सुरूवातीपासून रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याचे जिल्हावासीयांची चिंता दूर झाली आहे. १ ते ५ ऑक्टोंबर दरम्यान जिल्ह्यात एकूण ११७९ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.५४१ नवीन रुग्णांची नोंद झाली तर ८ बाधितांचा मृत्यू झाला आहे.मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे.यानंतर जवळपास पाच महिने कोरोना रुग्ण वाढीचा वेग नियंत्रणात होता. मार्च ते जुलै या पाच महिन्यात २८८ बाधितांची भर पडली तर पाच बाधितांचा मृत्यू झाला होता. मात्र ऑगस्ट महिन्यात ११६९ कोरोना बाधितांची नोंद झाली तर १६ बाधितांचा मृत्यू झाला. सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा विस्फोट झाल्याने ५६६९ कोरोना बाधित आणि ७७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना ससंर्गाच्या अनुषंगाने हे दोन महिने जिल्हावासीयांसाठी घातक ठरले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बधितांचा आकडा ७ हजार पार झाला तर कोरोना बळींचे शतक पूर्ण झाले. मागील दोन महिने सातत्याने रुग्ण वाढीचा आलेख उंचावत असल्याने मृतकांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्हावासीयांसह प्रशासनाची काळजी वाढली होती.ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच कोरोना बाधितांच्या संख्येत घट होण्यास सुरूवात झाली तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिलासादायक चित्र आहे.मागील पाच दिवसात ११७९ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली. तर ५४१ नवीन बाधितांची भर पडली. तर ८ बाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७२५८ कोरोना बाधित आढळले असून यापैकी ५१५२ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. तर १०६ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.ऑक्टोंबर महिन्यात रुग्ण संख्येत सातत्याने घट होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या