शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसभेच्या उपस्थिती भत्यात घसघशीत वाढ

By admin | Updated: November 20, 2014 22:55 IST

पंचायत राज व्यवस्थेने ग्रामसभेला विशेष अधिकार दिले असले तरी बहुतांश गावात ग्रामसभेला नगन्य उपस्थिती असते. ग्रामपंचायत सदस्यही ग्रामसभांना उपस्थित राहण्यास टाळाटाळ करतात.

गोंदिया : पंचायत राज व्यवस्थेने ग्रामसभेला विशेष अधिकार दिले असले तरी बहुतांश गावात ग्रामसभेला नगन्य उपस्थिती असते. ग्रामपंचायत सदस्यही ग्रामसभांना उपस्थित राहण्यास टाळाटाळ करतात. ही बाब लक्षात आल्याने शासनाने आता ग्रामसभेला उपस्थित भत्यात घसघशीत वाढ केली आहे. शासनाच्या वतीने प्रत्येक ग्रामसभेला उपस्थित राहणाऱ्या सदस्याला २०० रूपये भत्ता दिला जाणार आहे. पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायत विकासाचा केंद्र बिंदू आहे. गावाचा विकासाचे नियोजन गावातच व्हावे यासाठी ग्रामसभेला विशेष अधिकार देण्यात आले आहे. ग्रामसभेत बहुमताने ठरविलेली कामे केली जातात मात्र बहुतांश गावांमध्ये ग्रामसभा म्हणजे केवळ सोपस्कार झाला आहे. गावकरीही उपस्थित राहत नाही. परिणामी शासनाच्या उद्देशाला तडा जातो. काही मोजकीच मंडळी गावाच्या विकासाचा निर्णय घेतात. हा प्रकार टाळण्यासाठी ग्रामविकास विभागाने पुढाकार घेत सभेला उपस्थित राहणाऱ्या सदस्यांना मानधन देण्याचा निर्णय घेतला. परंतु सुरूवातीला नाममात्र २५ रूपये भत्ता दिला जाता होता. त्यामुळे अनेक सदस्य मासिक सभेला पाठ फिरवित होते. आपल्या मानधनात वाढ करावी अशी मागणी त्यांनी केली होती. ही मागणी मान्य करीत आता या मागणीत घसघशीत आठ पट वाढ झाली आहे. नव्या नियमानुसार मासिक सभेला उपस्थित राहणाऱ्या सदस्यांना २०० रूपये मानधन दिले जाणार आहे. यात ७५ टक्के वाटा शासनाचा तर २५ टक्के वाटा ग्रामपंचायातीला उचलावा लागणार आहे. यासोबतच सरपंच व उपसरपंचांना देण्यात येणाऱ्याा मानधनातही वाढ झाली आहे. ही वाढ गावच्या लोकसंख्येवर आधारित राहणार आहे. दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावाला एक हजार रूपये दोन ते आठ हजार लोकसंख्या असलेल्या गावाला दीड हजार रूपये, तर आठ हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावात दोन हजार रूपये मानधन मिळणार आहे. यातील ७५ टक्के वाटा हा शासन उचलणार आहे. वर्षभरात कितीही सभा झाला तरी उपस्थित भत्ता केवळ १२ सभांसाठीच देण्यात येणार आहे. त्यामुळे सदस्य १२ ही सभांना उपस्थित राहिल्यास त्याला वर्षभरांचे २४०० रूपये मिळणार आहेत. ग्रामविकासाचा केंद्रबिंदू असलेल्या ग्रामसभांच्या बळकटीकरणासाठी शासनाने हे पाऊस उचलले आहे. आता ग्रामसभांना सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांवर गावकरीही मोठयÞा संख्येने उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे. यातून गावाचा निश्चित विकास होणार असे नागरिकांमधून बोलल्या जात आहे. (प्रतिनिधी)