शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

महारेशीम अभियानात २९ गावांचा समावेश

By admin | Updated: March 23, 2017 01:05 IST

महाराष्ट्र शासन सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे महारेशीम अभियान ७ ते २५ मार्चपर्यंत राबविण्यास

रेशीम विकास रथ : ६५९ शेतकऱ्यांना दिली रेशीम उद्योगाची माहिती गोंदिया : महाराष्ट्र शासन सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे महारेशीम अभियान ७ ते २५ मार्चपर्यंत राबविण्यास जिल्हा रेशीम कार्यालयास नागपूर संचालनालयातून कळविण्यात आले. त्यानुसार जिल्हा रेशीम कार्यालय अर्जुनी-मोरगाव अंतर्गत पाच समुहातील २९ गावांमध्ये कार्यक्रम घेवून शेतकऱ्यांना रेशीम उद्योगाची माहिती देण्यात आली. महारेशीम अभियानाचे उद्घाटन नायब तहसीलदार ए.एस. पाटील, एन.एम. गावड, नायब तहसीलदार यावलकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. रेशीम विकास रथाला हिरवी झेंडी दाखवून अभियानाची सुरूवात करण्यात आली. या वेळी कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा रेशीम कार्यालयांतर्गत एकूण पाच समूह असून त्यापैकी प्रत्येक समुहात समाविष्ट गावांमध्ये कार्यक्रम घेण्यात आले. अर्जुनी-मोरगाव-१ या समुहात सात गावांत कार्यक्रम घेण्यात आले. त्यात १२६ शेतकरी उपस्थित होते. अर्जुनी-मोरगाव-२ समुहातील पाच गावांत कार्यक्रम घेण्यात आले. त्यात ९४ शेतकरी उपस्थित होते. अर्जुनी-मोरगाव-३ या समुहातील पाच गावांमध्ये कार्यक्रम घेण्यात आले. त्याचा लाभ ११० शेतकऱ्यांनी घेतला. सिरेगाव-१ समुहातील आठ गावांत कार्यक्रम घेण्यात आले, याचा लाभ तब्बल २३५ शेतकऱ्यांनी घेतला. तर सिरेगाव-२ समुहात चार गावांमध्ये झालेल्या कार्यक्रमात ९४ शेतकऱ्यांनी लाभ घेतला. ९ ते २१ मार्चपर्यंत जिल्ह्यातील एकूण २९ गावांमध्ये महारेशीम अभियान राबविण्यात आले. संबंधित जुने व नवीन इच्छुक शेतकऱ्यांना रेशीम उद्योगासंबंधी माहिती देण्यात आली. तसेच त्यांना रेशीम उद्योगाचे पॉम्प्लेट्स, पुस्तकेसुद्धा वाटप करण्यात आली. टसर रेशीम उद्योगातील सर्वच माहिती जसे अंडीपूंज उत्पादन माहिती, अनुदानाची माहिती, तसेच शासनाच्या सीडीपी योजना, पीक विमा योजना, कोष उत्पादन याबाबतची माहिती लाभार्थी व शेतकऱ्यांना देण्यात आली. (प्रतिनिधी) कार्यक्रम घेण्यात आलेली गावे रेशीम उद्योगाबाबत कार्यक्रम घेण्यात आलेल्या गावांमध्ये अरततोंडी, केशोरी, चिचगड, झाशीनगर, परसटोला, जेठभावडा, आमगाव (आदर्श), मकरधोकडा, शिलापूर, तिडका, करडगाव, ताडगाव, बोद्रा, धाबेटेकडी, देऊळगाव, विहीरगाव, दाभना, बोळदे (करड), सिलेझरी, निमगाव, झरपडा, नवेगावबांध, एलोडी, जांभळी, चान्ना, भिवखिडकी, मुंगली, सोनका व सालई यांचा समावेश आहे. यात एकूण ६५९ शेतकऱ्यांना रेशीम उद्योगाची माहिती देण्यात आली. यात सुरूवातीची सहा गावे नवीन असून उर्वरित २३ गावे जुनी टसर रेशीम उद्योगाशी संबंधित आहेत.