ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे उपाशीपोटी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 05:00 AM2020-05-26T05:00:00+5:302020-05-26T05:00:27+5:30

शासन व प्रशासनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर लक्ष दिले असते तर त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली नसती. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देवून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर आलेले उपासमारीचे संकट दूर करावे अशी मागणी तिरोडा तालुकाध्यक्ष धनेश्वर जमईवार, सचिव आशिष उरकुडे व जिल्हा सचिव रविंद्र किटे यांनी केली आहे.

Hunger agitation of Gram Panchayat employees | ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे उपाशीपोटी आंदोलन

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे उपाशीपोटी आंदोलन

Next
ठळक मुद्देकाळी फीत लावून केले काम : आंदोलनातून नोंदविला शासन व प्रशासनाचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क
सुकडी-डाकराम : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये कर्मचाऱ्यांनी एक दिवस उपाशीपोटी व काळी फित लावून काम करून शासन व प्रशासनाचा निषेध नोंदविला.
माहे जानेवारी-२०२० पासून शासनाकडून येणारा निधी उडकवून ठेवला असून ग्रामपंचायतकडून वेतन दिले जात नाही. शासन व प्रशासनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर लक्ष दिले असते तर त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली नसती. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देवून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर आलेले उपासमारीचे संकट दूर करावे अशी मागणी तिरोडा तालुकाध्यक्ष धनेश्वर जमईवार, सचिव आशिष उरकुडे व जिल्हा सचिव रविंद्र किटे यांनी केली आहे.
सध्या सुरु असलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावातही ग्रामपंचायत कर्मचारी आपली जबाबदारी पार पाडत आहे. बाहेरून आलेल्या व्यक्तींची विचारपूस व त्यांची व्यवस्था तसेच ग्रामपंचायतची कामे सुरळीत करणे करीत आहेत. अशातही प्रशासनाचे त्यांच्याकडे दुर्लक्ष असल्याने त्यांनी शेवटी एक दिवस उपाशीपोटी काम करून आंदोलन केले.
यामध्ये, तालुकाध्यक्ष जमईवार, सचिव उरकुडे, उपाध्यक्ष ओंकार बघेले, सहसचिव गणेश कांबळे, कोषाध्यक्ष सुनील फटींग, राजू लिल्हारे, रिषीपाल डोंगरे, अजय शेंदरे, देवचंद बारापात्रे, मोरेश्वर फुंडकर, प्रयाग नंदरधने, शैलेश रहांगडाले, अनिल राणे व अन्य ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते.

Web Title: Hunger agitation of Gram Panchayat employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.