सीतेपार येथे ट्रॅक्टरच्या धडकेत इसम जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:16 IST2017-07-20T00:16:35+5:302017-07-20T00:16:35+5:30

सितेपार येथील यशवंत ताराचंद सिंगाडे (३५) आपल्या घरी परत येत असताना शेजारच्या शेतामधून ट्रॅक्टर

He was injured in a tractor crash at Sitpar | सीतेपार येथे ट्रॅक्टरच्या धडकेत इसम जखमी

सीतेपार येथे ट्रॅक्टरच्या धडकेत इसम जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरी : सितेपार येथील यशवंत ताराचंद सिंगाडे (३५) आपल्या घरी परत येत असताना शेजारच्या शेतामधून ट्रॅक्टर चालक मनोज प्यारेलाल पटले रा. सीतेपार याने अनियंत्रितपणे वाहन चालवून त्यांना धडक दिली. त्यामुळे यशवंत सिंगाडे यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र पांढरी येथे उपचार करण्यासाठी नेण्यात आले. मात्र जखम गंभीर असल्यामुळे त्यांना शासकीय रुग्णालय गोंदिया येथे हलविण्यात आले. ट्रॅक्टर मालकाचे नाव दुर्गाप्रसाद भोजलाल तुरकर असे असून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Web Title: He was injured in a tractor crash at Sitpar