शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

घृणास्पद

By admin | Updated: January 4, 2015 23:13 IST

वंशाच्या दिव्याच्या लालसेपोटी गर्भातच मुलींचा जीव घेण्याचे, जन्मानंतर तिला फेकून देण्याचे सत्र थांबलेले नाही. रविवारी सकाळी सिव्हील लाईंन्स परिसरातील नागराज चौकाजवळील

नवजात मुलीला फेकले गोंदिया : वंशाच्या दिव्याच्या लालसेपोटी गर्भातच मुलींचा जीव घेण्याचे, जन्मानंतर तिला फेकून देण्याचे सत्र थांबलेले नाही. रविवारी सकाळी सिव्हील लाईंन्स परिसरातील नागराज चौकाजवळील मैदानात एक नवजात कन्या बेवारस स्थितीत आढळून आली. कुत्र्यांनी या चिमुकलीचे लचके तोडल्यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे. मृत्युशी झुंज देत असलेल्या या चिमुकलिला परिसरातील काही तरूणांनी उपचारार्थ बाई गंगाबाई रूग्णालयात दाखल केले. दुपारनंतर तिला उपचारार्थ नागपूरला हलविण्यात आले. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या प्रकारावर शहरात संताप व्यक्त केला जात आहे. आज ईदचा दिवस असल्याने परिसरात सकाळपासूनच वर्दळ होती. शहरातील सिव्हील लाईन्स परिसरातील डॉ. जयपुरिया यांच्या नर्सिंग होम जवळील मैदानात सकाळी ७ वाजता दरम्यान नवजात बाळ बेवारस स्थितीत पडून असल्याचे काही नागरिकांना दिसून आले. ही बातमी कळताच घटनास्थळी एकच गर्दी जमली. नागरिकांनी अर्भकाला उचलले असता ते कन्या रत्न असल्याचे व बेवारस कुत्र्यांनी तिच्या डोळ्याला, मांडीला चावा घेतला असल्याचे दिसून आले. परिसरातील रहिवासी इरशाद अहमद कुरेशी, राकेश बबनराव बेलगे, सय्यद असलम अली, परवेज शेख या तरूणांनी लगेच तिला बीजीडब्ल्यू रूग्णालयात नेले. रूग्णालयात ड्यूटीवर असलेल्या डॉ. विजय माळी यांनी प्रकृती बघून तिला अतिदक्षता विभागात दाखल केले. विशेष म्हणजे उघडयावर थंडीत फेकण्यात आल्याने चिमुकलीचे शरीर थंडगार झाले होते. शिवाय जखमांमधून रक्तस्त्रावही सुरू होता. डॉक्टरांनी यावर लागलीच उपचार सुरू केले. ऊब देण्यासाठी तिला ‘इन्क्युबेटर’मध्ये ठेवले. दुपारनंतर तिला उपचारार्थ नागपूरला हलविण्यात आले. (प्रतिनिधी)मुलीच्या सलामतीसाठी अल्लाहकडे दुआजन्माला मुलगी आल्याने तिचा स्वीकार न करण्याच्या उद्देशातून किंवा अनैतीक संबंधातून घडलेला हा प्रकार असावा असा कयास लावला जात आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने शहरातवासीयांत एकीकडे रोष व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे मात्र मृत्यूच्या दारात उभ्या त्या चिमुकलीसाठी अल्लाहकडे मागणी करणार असल्याचे तिला रूग्णालयात नेणाऱ्या मुस्लीम बांधवांनी बोलून दाखविले. शहर पोलिसांत तक्रार या प्रकाराबाबत पोलिसांत माहिती देण्यात आली होती. त्यानुसार फिर्यादी राकेश बबनराव बेलगे (३७,रा.नागराज चौक) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंविच्या कलम ३१७ अंतर्गत प्रकरणाची नोंद केली आहे.