गोंदियाच्या तापमानात सलग दुसऱ्या दिवशी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 06:00 AM2019-12-29T06:00:00+5:302019-12-29T06:00:20+5:30

हवामान विभागाने विदर्भातील काही जिल्ह्यातील तापमानात पुढील दोन दिवसात आणखी घट होण्याचा अंदाज वर्तविला आहे.विदर्भात दरवर्षी डिसेंबरच्या शेवटी आणि जानेवारी महिन्याच्या सुरूवातीला थंडीत वाढ होत असते. त्यातच दोन दिवसांपूर्वी विदर्भात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात अचानक गारवा निर्माण झाला परिणाम तापमानात सुध्दा घट झाली.

Gondia temperature drops for the next day in a row | गोंदियाच्या तापमानात सलग दुसऱ्या दिवशी घट

गोंदियाच्या तापमानात सलग दुसऱ्या दिवशी घट

Next
ठळक मुद्दे५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। दैनंदिन कामकाजावर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात गुरूवारी पावसाने हजेरी लावल्यानंतर वातावरणात गारवा निर्माण झाला होता. परिणामी शुक्रवारी (दि.२७) जिल्ह्यात १०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर शनिवारी दुसºया दिवशी पुन्हा तपामानात घट झाली असून पारा ५.२ अंश सेल्सिअसवर आला होता. त्यामुळे जिल्हा गारठल्याचे चित्र होते. पारा एकदम ५.२ अंश सेल्सिअसवर आल्याने दिवसभर हुडहुडी भरली होती.
हवामान विभागाने विदर्भातील काही जिल्ह्यातील तापमानात पुढील दोन दिवसात आणखी घट होण्याचा अंदाज वर्तविला आहे.विदर्भात दरवर्षी डिसेंबरच्या शेवटी आणि जानेवारी महिन्याच्या सुरूवातीला थंडीत वाढ होत असते. त्यातच दोन दिवसांपूर्वी विदर्भात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात अचानक गारवा निर्माण झाला परिणाम तापमानात सुध्दा घट झाली. गोंदिया येथे शुक्रवारी १०.५ तर शनिवारी ५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तापमानात एकदम ५ अंश सेल्सिअसने घट झाल्याने थंडी वाढली. परिणामी शनिवारी दिवसभर हुडहुडी भरल्याचे चित्र होते. थंडीमुळे अनेकांनी घराबाहेर न पडता घरीच शेकोट्या पेटविल्याचे चित्र होते. तर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुध्दा हेच चित्र होते. मागील दहा वर्षात प्रथमच जिल्ह्याचे तापमान ५.२ अंश सेल्सिअसवर आल्याने याचा नागरिकांच्या दैनदिन कामांवर सुध्दा परिणाम झाला होता. तर अनेकांनी ऊनी कपडे खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी केली होती. मागील दोन दिवसात थंडीत वाढ झाल्याने स्वेटर विक्रेत्यांच्या विक्रीत सुध्दा वाढ झाली होती.

३.२ अंश सेल्सिअस तापमानाचा रेकार्ड
जिल्ह्यात सन डिसेंबर २०१० मध्ये ३.२ अंश सेल्सिअस सर्वात कमी तापमानाची नोंद झाली होती. हा रेकार्ड मागील दहा वर्षांत अद्यापही मोडलेला नाही. त्यानंतर यंदा शनिवारी जिल्ह्यात ५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस तापमान पुन्हा कमी होण्याचा अंदाज वर्तविली आहे. त्यामुळे यंदा हा रेकार्ड मोडण्याची शक्यता आहे.

Web Title: Gondia temperature drops for the next day in a row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.