शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात गोंदिया सर्वात थंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 06:00 IST

अवकाळी पाऊस आणि उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे विदर्भात शीत लहर आली असून यामुळे तापमानात घट झाली आहे.शुक्रवारी गोंदियाचे तापमान ८.२ अंश सेल्सिअसवर आल्याने थंडीत वाढ झाल्याने दिवसभर हुडहुडी भरली होती. शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना शेकोट्या पेटवून ऊब घेऊन थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्दे८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद : पुढील दोन दिवस पुन्हा तापमानात घट होण्याची शक्यता, दैनदिन कामावर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात बुधवारी आणि गुरूवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली.त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. तर शुक्रवारी (दि.१०) तापमानात घट झाल्याने हुडहुडी वाढली होती. शुक्रवारी विदर्भात सर्वात कमी ८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद गोंदिया येथे झाली आहे.त्यामुळे विदर्भात गोंदिया सर्वात थंड होते.अवकाळी पाऊस आणि उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे विदर्भात शीत लहर आली असून यामुळे तापमानात घट झाली आहे.शुक्रवारी गोंदियाचे तापमान ८.२ अंश सेल्सिअसवर आल्याने थंडीत वाढ झाल्याने दिवसभर हुडहुडी भरली होती. शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना शेकोट्या पेटवून ऊब घेऊन थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. थंडीत वाढ झाल्याने याचा नागरिकांच्या दैनदिन कामावर सुध्दा परिणाम झाला होता.थंडीत वाढ झाल्याने स्वेटर विक्रेत्यांच्या दुकानातील गर्दीत वाढ झाली होती. जिल्ह्यात मौसमातील सर्वात कमी ५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद मागील वर्षी २८ डिसेंबर रोजी झाली होती. त्यानंतर पुन्हा तापमानात वाढ झाली होती. मात्र हवामान खात्याने जिल्ह्यात ११ जानेवारीपर्यत गारपीट आणि अवकाळी पावसाचा इशारा दिला होता.बुधवार आणि गुरूवारी जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. तर गोंदिया महसूल मंडळात ६६ मि.मी.पावसाची नोंद झाल्याने अतिवृष्टी झाली. अवकाळी पावसामुळे सुध्दा वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे जिल्ह्यातील तापमानात घट झाली असल्याचे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पुढील दोन दिवस पुन्हा जिल्ह्यातील तापमानात घट होण्याचा अंदाज या विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे पुन्हा दोन दिवस जिल्हावासीयांना हुडहुडीपासून सुटका नसल्याचे चित्र आहे.स्वेटरसह रेनकोट बाहेरजिल्ह्यात मागील तीन चार दिवसांपासून अवकाळी पाऊस होत आहे. तर दुसरीकडे थंडी देखील वाढ झाली आहे.त्यामुळे जिल्हावासीयांना स्वेटरसह रेनकोट देखील सोबत ठेवण्याची वेळ आली आहे.थंडी आणि पावसामुळे निर्माण झालेल्या वातावरण सोशल मीडियावर सुध्दा चांगले जोक तयार केले जात आहे. तर अनेक ज्येष्ठ नागरिक मागील आठ दहा वर्षांत ऐवढी थंडी कधीच पडली नसल्याचे सांगत आहे.वातावरणातील बदलाचा परिणामपर्यावरण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात वातावरणातील बदलाचा सर्वाधिक परिणाम विदर्भातील दोन तीन जिल्ह्यावर होत असल्याचा अहवाल दिला होता. त्यात गोंदियाचा देखील समावेश होता. जंगलाचे कमी होत चालले प्रमाण,जमिनीची धूप, पांरपारिक पिकांची लागवड, प्रदूषणात होत असलेली वाढ यासर्व गोष्टींमुळे हे बदल होत असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :weatherहवामान