शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीत ‘फ्री सेल’ नावापुरतीच

By admin | Updated: January 5, 2015 23:05 IST

शेतकऱ्यांना थेट व्यापाऱ्यांसोबत व्यवहार करता यावा व अडत्यांना (दलालांना) द्यावे लागत असलेल्या अडतपासून (दलाली) सुटका व्हावी या उद्देशातून कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘फ्री सेल’ सुरू करण्यात आली.

कपिल केकत - गोंदियाशेतकऱ्यांना थेट व्यापाऱ्यांसोबत व्यवहार करता यावा व अडत्यांना (दलालांना) द्यावे लागत असलेल्या अडतपासून (दलाली) सुटका व्हावी या उद्देशातून कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘फ्री सेल’ सुरू करण्यात आली. मात्र मागील कित्येक वर्षांपासून या फ्री सेलमधून शेतकऱ्यांनी व्यवहारच केला नसल्याची माहिती आहे. अडते शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो भाव मिळवून देत असून रोख पेमेंट करीत असल्याने शेतकऱ्यांचीच फ्री सेलमधून व्यवहार करण्याबाबत अनिच्छा असल्याचे बाजार समितीत बोलले जाते. बाजार समितीत होत असलेल्या व्यवहारांत अडते (दलाल) महत्वाची भुमिका बजावतात. या मोबदल्यात मात्र शेतकऱ्यांच्या मालाला जास्तीत जास्त भाव मिळवून देण्यासाठी अडते मदत करतात. मात्र यासाठी शेतकऱ्यांना अडत्यांना व्यवहार करण्यात रकमेच्या काही टक्के अडत द्यावी लागते. येथील बाजार समितीत ही अडत तीन टक्के घेतली जाते. शेतकऱ्यांना ही अडत द्यावी लागू नये व त्यांची ही रक्कम वाचावी या उद्देशातून ‘फ्री सेल’ बाजार समितीत सुरू करण्यात आली आहे. सन १९६० पासून व्यवहारात असलेल्या येथील बाजार समितीत ही पद्धती सुरू आहे. येथे आश्चर्याची बाब मात्र अशी की, या ‘फ्री सेल’ मधून मागील कित्येक वर्षांपासून एकही व्यवहार शेतकऱ्यांनी केलेला नाही. परिणामी बाजार समितीत ‘फ्री सेल’ ही व्यवहाराची पद्धत नाममात्र ठरत आहे. तसेच ‘फ्री सेल’ साठी बाजार समितीत क्रमांक १ चे शेड राखीव ठेवण्यात आले होते. मात्र ‘फ्री सेल’ मधून व्यवहारच होत नसल्याने बाजार समिती जागा कमी पडत असल्याने आता त्या शेड मधून दररोजचे व्यवहार करीत आहे. ‘फ्री सेल’ अंतर्गत व्यवहार करण्याची पद्धत या व्यवहार पद्धतींतर्गत अडते राहत नाही. शेतकरी थेट बाजार समितीत कार्यरत व्यापाऱ्यांसोबत मालाच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करतात. यासाठी शेतकऱ्याला प्रथम बाजार समितीकडे नोंद करावी लागते. यावर बाजार समिती शेतकऱ्याला बाजार समितीचा एक कर्मचारी देतो व शेतकऱ्याचा माल फ्री सेल साठी असलेल्या शेड मध्ये ठेवला जातो. यासाठी मात्र संबंधीत शेतकऱ्याला त्याच्या मालाची सफाई करणे, पोत्यात भरणे, शेड मध्ये माल साचून ठेवणे आदी कामांसाठी हमालांना मजूरी द्यावी लागते. त्यानंतर बाजार समितीचा कर्मचारी मालाचा लिलाव करीत असून बोली लावून घेण्यास मदत करतो.