शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियातील रस्त्यावर जीवघेणे खड्डे

By admin | Updated: November 22, 2014 00:39 IST

शहरातील रस्त्यांच्या मधोमध असलेले गटार लाईनचे खड्डे अनेक दिवसांपासून उघड्या अवस्थेत आहेत.

गोंदिया : शहरातील रस्त्यांच्या मधोमध असलेले गटार लाईनचे खड्डे अनेक दिवसांपासून उघड्या अवस्थेत आहेत. या खड्ड्यांमुळे दररोज लहान-मोठे अपघात घडतात. मात्र पालिकेच्या बांधकाम विभागाला अजूनही जाग आलेली नाही. अनेक वेळा याबाबत पालिकेला कळविल्यानंतरही या खड्ड्यांवर साधे झाकण लावण्याचे सौजन्य दाखविल्या जात नसल्यामुळे न.प.प्रशासनाची आपल्या यंत्रणेवरील पकड किती सुटली याची कल्पना येत आहे.रस्त्यांच्या मधातून जात असलेल्या नाल्यांची सफाई करण्यासाठी मधोमध खड्डे (आऊटलेट) बनविण्यात आले आहेत. मात्र सफाईचे काम झाल्यानंतर त्यावर झाकण लावण्याचे औचित्य मात्र दाखविले जात नाही. त्यामुळे पालिका प्रशासन या खड्ड्यात एखाद्या वाहनधारकाने पडून त्याचा बळी जावा किंवा मोठा अपघात व्हावा याची तर वाट बघत नाही ना, असा सवाल आता शहरवासीय करू लागले आहेत.उघड्यावर पडून असलेल्या या खड्ड्यांमुळे दिवसा तर नाही, मात्र रात्रीला कित्येकदा लहान-सहान अपघात घडतात. कित्येक जणं वाहनासह या खड्ड्यांत पडून जखमी झाल्याचेही ऐकीवात आहे. हे सर्व प्रकार घडत असतानाही पालिकेच्या बांधकाम विभागाचे याकडे सपशेल दुर्लक्ष दिसून येते. विशेष म्हणजे त्या खड्ड्यांचे झाकणही बाजुलाच पडून असते. त्यामुळे वाहनधारकांना तो खड्डा आणि त्याचे झाकण अशा दोन्हीपासून बचाव करीत कसरत करावी लागते. ज्या खड्ड्यांचे झाकणच नाही त्यांच्यासाठी झाकण बनवून ते खड्डे बंद पाडण्याची गरज आहे. मात्र नगर पालिकेला मलाईदार कामातूनच वेळ काढून नागरिकांच्या जीविताशी संबंधित अशा कामांकडे लक्ष देण्याची गरजच वाटत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. (शहर प्रतिनिधी)