सुस्त प्रशासनामुळे उपोषण सुरू

By Admin | Updated: December 11, 2014 23:09 IST2014-12-11T23:09:20+5:302014-12-11T23:09:20+5:30

पंचायत समितीच्या गचाळ कारभाराचा घरकुल प्रकरणात प्रत्यय आला असून दिलेल्या लेखी आश्वासनाची खंड विकास अधिकारी जी.डी. कोरडे यांनी वेळेवर पूर्तता न केल्यामुळे रवि कुदरुपाका

Fasting started due to the slow administration | सुस्त प्रशासनामुळे उपोषण सुरू

सुस्त प्रशासनामुळे उपोषण सुरू

पहिला दिवस : घरकूलप्रकरणी कारवाई करण्याची मागणी
अर्जुनी/मोरगाव : पंचायत समितीच्या गचाळ कारभाराचा घरकुल प्रकरणात प्रत्यय आला असून दिलेल्या लेखी आश्वासनाची खंड विकास अधिकारी जी.डी. कोरडे यांनी वेळेवर पूर्तता न केल्यामुळे रवि कुदरुपाका हे गुरूवारी (दि.११) पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणावर बसले आहेत.
प्राप्त माहितीनुसार अर्जुनी/मोरगाव येथील अरविंद बोरकर यांनी मंजूर झालेल्या जागेवर घरकुल बांधकाम न करता वॉर्ड क्र. ३ च्या शासकीय जागेवर बांधकाम केले. ग्रामविकास अधिकारी जी.के. बावणे यांनी या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी केली असून लाभार्थ्याला बिल अदा करण्यास हरकत नसल्याचे प्रमाणपत्र दिले. यावरून पंचायत समितीच्या बांधकाम विभागाने लाभार्थ्याला ५० हजार रुपये आ केले. या देयकावर खंड विकास अधिकाऱ्यांची स्वाक्षरी आहे. हा सर्व प्रकार आर्थिक व्यवहारातून बिनबोभाटपणे सुरू आहे. तालुक्यात अशी शेकडो घरकुलांचे बांधकाम शासकीय जागेवर करण्यात आले आहेत.
या प्रकरणाची रवि कुदरुपाका यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली. पंचायत समितीचे अभियंता टी.पी. कचरे यांनी चौकशी करुन अहवाल दिला. या अहवालात लाभार्थी अरविंद बोरकर व ग्रामसेवक बावणे यांना दोषी ठरविण्यात आले. हा अहवाल गोंदिया जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला. प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा गोंदिया यांनी कारवाई करण्याचे आदेश खंड विकास अधिकाऱ्यांना दिले. मात्र सुस्त खंड विकास अधिकाऱ्यांनी यावर कसलीच कारवाई केली नाही. कुदरुपाका यांनी १ डिसेंबर रोजी आमरण उपोषण केले. यावेळी खंड विकास अधिकारी कोरडे यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले. मात्र त्यांनी हे आश्वासन न पाळल्यामुळे कुदरुपाका यांनी आज गुरुवार (दि.११) पासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. खंड विकास अधिकाऱ्यांवर दिरंगाईचा ठपका ठेवून कारवाई करावी, अशी मागणी कुदरुपाका यांची आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Fasting started due to the slow administration