शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
3
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
4
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
5
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
6
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
7
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
8
Top Marathi News LIVE Updates: १ मेपासून मराठीची मोहीम सुरूच राहणार; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
9
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
10
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
11
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
12
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
13
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
14
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
15
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
16
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
17
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
18
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
19
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
20
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याला दमदार पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 05:00 IST

दररोज सकाळ-संध्याकाळी आकाशात ढगाळ वातावरण निर्माण होते. बघता-बघता पावसाचे शिंतोडे पडतात व आता पाऊस पडेल अशी आशा पल्लवीत होतानाच पाऊस दगा देऊन निघून जातो व उन्ह तापू लागते. त्यामुळे रोवणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहे. आज पाऊस नाही आला तरी उद्या नक्की पडेल या अपेक्षेने शेतकरी आपल्या घरी परत येतो.

ठळक मुद्देवरूण राजाकडे पावसाची हाक : पावसाअभावी रोवण्या खोळंबल्या

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : पावसाअभावी हजारो शेतकऱ्यांची रोवणी खोळंबली असून रोवणी करण्यासाठी एकदा तरी जोराने बरस देवा म्हणून बळीराजा वरुण राजाकडे साकडे घालत असल्याचे चित्र आहे.दररोज सकाळ-संध्याकाळी आकाशात ढगाळ वातावरण निर्माण होते. बघता-बघता पावसाचे शिंतोडे पडतात व आता पाऊस पडेल अशी आशा पल्लवीत होतानाच पाऊस दगा देऊन निघून जातो व उन्ह तापू लागते. त्यामुळे रोवणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहे. आज पाऊस नाही आला तरी उद्या नक्की पडेल या अपेक्षेने शेतकरी आपल्या घरी परत येतो. पुन्हा पाऊस आला तर उद्याला रोवणी कुठून सुरु करायची याचे नियोजन करण्याचे स्वप्न बघू लागतो.हा क्रम मागील दोन आठवड्यांपाूसन या तलुक्यात बघायला मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात बोअरवेलने पाण्याची सोय आहे त्या शेतकऱ्यांची रोवणी आता संपण्याच्या मार्गावर आहे. कित्येकांची रोवणी आटोपली आहे. परंतु वरथेंबी पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना आणखी किती दिवस दमदार पावसाची वाट बघावी लागेल हे सांगता येत नाही.हवामान खात्याचा अंदाज फोलयंदा समाधानकारक पाऊस पडेल किंवा अपेक्षेपेक्षा जास्त ही पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. परंतु सध्याची स्थिती पाहून असे वाटते की हवामान खात्याचे भाकीत निरर्थक ठरणार असून याचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती