शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा प्रयोग ठरतोय प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST

शासनाच्या शेततळे योजनेंतर्गत तालुक्यात कृषी विभागाच्यावतीने शेततळे व बोडी शेतकऱ्यांच्या शेतात तयार करण्यात आल्या आहे. शेतकऱ्यांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून इतरत्र पीक व उत्पादन घ्यावे असा उद्देश शासनाचा आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यावर कृषी विभाग खूप भर देत आहे. मागेल त्याला शेततळे व बोडी देण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : सततच्या अस्मानी व अवकाळी संकटांना सामोरे जाणाऱ्यां शेतकऱ्यांना काही तरी जोडधंदा करण्यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. या अनुषंगाने तालुक्यातील शेतकºयाने मिळालेल्या बोडीत मत्स्यपालन व शिंगाडा उत्पादन करुन शेतीतील तूट भरुन काढली. शिवाय आणखी एक यशस्वी प्रयोग सेंद्रीय भागात पिकाच्या शेतात मस्त्यपालन करुन उत्पन्नात दुपटीने वाढ केली आहे. या प्रयोगातून शेतकºयाने इतर शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे.शासनाच्या शेततळे योजनेंतर्गत तालुक्यात कृषी विभागाच्यावतीने शेततळे व बोडी शेतकऱ्यांच्या शेतात तयार करण्यात आल्या आहे. शेतकऱ्यांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून इतरत्र पीक व उत्पादन घ्यावे असा उद्देश शासनाचा आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यावर कृषी विभाग खूप भर देत आहे. मागेल त्याला शेततळे व बोडी देण्यात आले आहेत. त्यातून ग्राम बिहिरीया येथील शेतकरी डुलीचंद नारायण पटले यांनी पारंपारीक पिकांसह दुसरे पीक घेण्याचा विचार केला. त्यात त्यांनी मिळालेल्या बोडीत मत्स्य जिवांची बिजाई टाकून मत्स्य उत्पादन घेतले.सोबतच शिंगाड्याची शेतीही केली व त्यातून यशस्वीपणे उत्पादन घेवून भात पिकाची तुट भरुन काढली. एवढ्यावरच न थांबता आणखी एका आगळ्यावेगळ्या प्रयोगाची पायाभरणी केली.सेंद्रीय भाताच्या शेतात मत्स्य जिवांची बिजाई घालून भाताबरोबरच मत्स्य उत्पादन हा प्रयोग यशस्वी केला व आपल्या उत्पन्नात दुपटीने वाढ केली. त्यामुळे त्यांच्या या आगळ्या वेगळ्या प्रयोगाची प्रशंसा संपूर्ण जिल्हास्तरावर होत आहे.हा यशस्वी प्रयोग पाहण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच संपूर्ण जिल्ह्यातील तालुका कृषी अधिकाºयांनी भेट देवून पाहणी केली.

टॅग्स :Farmerशेतकरी