शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो तुर्तास धान कापणी नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 05:00 IST

जिल्ह्यात खरीप हंगामात सर्वाधिक १ लाख ९९ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली आहे. सध्या हलक्या धानाची कापणी आणि मळणी सुरू आहे. जड धान निसविण्याच्या मार्गावर आहे. जड धानासाठी हा पाऊस अनुकुल मानला जात आहे.मात्र हलक्या धानाची कापणी सुरू असून कापणी केलेला धान तसाच बांध्यामध्ये पडून आहे. त्यामुळे मंगळवार आणि बुधवारी (दि.७) झालेल्या परतीच्या पावसाचा फटका कापणीला केलेल्या धानाला बसला.

ठळक मुद्देपरतीचा पावसाची शक्यता : कृषी विभागाने दिला अर्लट

लोकमत न्यूज नेटवर्कगोदिया : जिल्ह्यात काही शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील हलक्या धानाच्या कापणीला सुरूवात केली आहे. मात्र याच दरम्यान परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने कापणी केलेल्या धानाला याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. हवामान विभागाने १४ ऑक्टोबरपर्यंत पावसाचा इशारा दिला असून शेतकऱ्यांनी हलक्या धानाची कापणी तुर्तास करु नये अशा इशारा कृषी विभागाने दिला आहे.जिल्ह्यात खरीप हंगामात सर्वाधिक १ लाख ९९ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली आहे. सध्या हलक्या धानाची कापणी आणि मळणी सुरू आहे. जड धान निसविण्याच्या मार्गावर आहे. जड धानासाठी हा पाऊस अनुकुल मानला जात आहे.मात्र हलक्या धानाची कापणी सुरू असून कापणी केलेला धान तसाच बांध्यामध्ये पडून आहे. त्यामुळे मंगळवार आणि बुधवारी (दि.७) झालेल्या परतीच्या पावसाचा फटका कापणीला केलेल्या धानाला बसला. परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.काही शेतकऱ्यांनी हलक्या धानाची मळणी करण्यास सुरूवात केली होती, त्याला सुध्दा पावसाचा फटका बसल्याने धान पाखड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यातील काही शेतकरी जड धानासह हलका धानाची सुध्दा लागवड करतात. हलके धान हे दिवाळीपूर्वी निघत असल्याने या धानाची विक्री करुन शेतकरी दिवाळी सण साजरा करतात.दिवाळीचा सण एक महिनावर असून यंदा त्यापुर्वीच हलका धान निघाल्याने लगबगीने धानाची कापणी करुन त्याची मळणी करण्यास सुरूवात केली आहे. मात्र यंदा परतीचा पाऊस चांगलाच बरसत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच हवामान विभागाने १४ ऑक्टोबरपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवरील संकट टळले नसून त्यांनी वेळीच सावध होत धान कापणी आणि मळणी थांबवावी अशा सूचना कृषी विभागाने केल्या आहेत.३० हजार हेक्टरला फटकाजिल्ह्यात मंगळवारी आणि बुधवारी झालेल्या परतीच्या जोरदार पावसामुळे ३० हजार हेक्टरवरील पिकांना फटका सबला आहे.पाऊस आणि वाऱ्यामुळे शेतातील धानपिक झोपल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे त्यांनी नुकसानीची माहिती ७२ तासांच्या आत विमा कंपनीला देण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहे. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.हवामान विभागाने १४ ऑक्टोबर दरम्यान पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे या कालावधी शेतकऱ्यांनी धानाची कापणी आणि मळणी करु नये, तसेच हलक्या धान पिकाचे नुकसान झाले असल्यास त्याची माहिती विमा कंपनीला ७२ तासाच्या आत द्यावी.- गणेश घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती