शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

सिंचनासाठी शेतकरी ‘आसुसला’

By admin | Updated: January 3, 2015 23:05 IST

सतत कोणत्या ना कोणत्या समस्येत फसणारा शेतकरी आता उन्हाळी धानपीक घेण्यासाठी पुढे सरसावला आहे. इटियाडोह प्रकल्पाचे पाणी उन्हाळी धान पिकासाठी कालव्याद्वारे सोडण्यात

इटियाडोहचे पाणी सुटले इटखेडा : सतत कोणत्या ना कोणत्या समस्येत फसणारा शेतकरी आता उन्हाळी धानपीक घेण्यासाठी पुढे सरसावला आहे. इटियाडोह प्रकल्पाचे पाणी उन्हाळी धान पिकासाठी कालव्याद्वारे सोडण्यात आल्याने प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतीविषयक कामांना सुरूवात केली आहे. त्याद्वारे इटखेडा परिसरातील सुमारे ३०० हेक्टर शेतजमिनीला सिंचनाची सोय उपलब्ध होणार आहे. उन्हाळी धान पिकांच्या उत्पादनातून आता तरी कर्जमुक्ती होईल, हीच आशा त्यांची पुन्हा बळावली आहे. या परिसरातील शेतकऱ्यांना आता बांधावरील गवत कापणे, धानाच्या रोपवाटिकेसाठी नागरणी करणे, बी-बियाण्यांची जुळवाजुळव करणे आदी शेतीविषयक कामांची लगबग वाढली आहे. शेतकऱ्यांच्या शेतांना सिंचन होण्याच्या दृष्टिने येथील समृद्धी वापर संस्थेच्या अधिपत्याखालील इटखेडा, इसापूर, घाटी पळसगाव, कन्हाळगाव येथील शेतकऱ्यांना सुमारे ३०० हेक्टर शेतीसाठी सिंचनाची सोय उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचावे या दृष्टिने पाटांची डागडुजी करणे, पाणी अडू नये यासाठी पाणी वाहून जाणाऱ्या पात्रातील गवत कापणे व स्वच्छता ठेवणे आदी बाबी पाणी वापर संस्थेने शेतकऱ्यांच्या हितासाठी कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.पाणी ही राष्ट्रीय संपत्ती असून त्याचे योग्य नियोजन करावे व सिंचनाच्या पाण्याचा व्यवस्थित उपयोग करावे, असे आवाहन समृद्धी पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष इंद्रदास झिलपे, देविदास पालिवाल, दामोदर चांदेवार, शालिकराम हुकरे, वासुदेव लांजेवार, शालिकराम भोयर, वासुदेवराव उईके, विलास भावे, मोरेश्वर गोंडाणे, लिनता येरणे, मालन उईके, सुशीला गोंडाणे व संस्थेचे सचिव विजय मेश्राम यांनी केले आहे. (वार्ताहर)