शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
3
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
4
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
5
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
6
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
7
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
8
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
9
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
10
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
11
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
12
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
13
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
14
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
15
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
16
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
17
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
18
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
19
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
20
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
Daily Top 2Weekly Top 5

वेळेत मालमत्ता कर न भरल्यास 24 टक्के व्याज लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 05:00 IST

नगर परिषदेला मालमत्ता व दुकानगाळे भाडे यातून येणारे उत्पन्न हेच सर्वाधिक उत्पन्नाचे आर्थिक स्त्रोत आहेत. मात्र मालमत्ता व भाडे वसुली हेच नगर परिषदेसाठी सर्वाधिक डोकेदुखीचे काम आहे. मालमत्ता धारक व गाळे धारकांकडून पैसा भरण्यास होणारी टोलवाटोलवी त्यातच मधात येणारे राजकारण यामुळे नगर परिषदेची मालमत्ता व गाळे भाड्याची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.परिणामी आता एवढी मोठी रक्कम वसूल करताना नगर परिषदेच्या संबंधित विभागांची पंचाईत होत आहे.

ठळक मुद्देगुरूवारपर्यंत कर भरण्याचे फर्मान : कर वसुलीसाठी नगर परिषदेची मोहीम

  लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नगर परिषदेच्या आर्थिक उत्पन्नात महत्वाचा वाटा असलेल्या मालमत्ता कर वसुलीची स्थिती अतिशय चिंताजनक आहे. अशात नगर परिषदेला विविध कामे करणे कठीण जाते. यासाठी नगर परिषदेने कर वसुलीसाठी मोहीम छेडली असून येत्या १० तारखेपर्यंत मालमत्ता थकबाकीदारांना मालमत्ता करण्यास सांगीतले आहे. अन्यथा मालमत्ता थकबाकीवर २४ टक्के व्याज लावले जाणार असल्याचे फर्मान काढले आहे. नगर परिषदेला मालमत्ता व दुकानगाळे भाडे यातून येणारे उत्पन्न हेच सर्वाधिक उत्पन्नाचे आर्थिक स्त्रोत आहेत. मात्र मालमत्ता व भाडे वसुली हेच नगर परिषदेसाठी सर्वाधिक डोकेदुखीचे काम आहे. मालमत्ता धारक व गाळे धारकांकडून पैसा भरण्यास होणारी टोलवाटोलवी त्यातच मधात येणारे राजकारण यामुळे नगर परिषदेची मालमत्ता व गाळे भाड्याची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.परिणामी आता एवढी मोठी रक्कम वसूल करताना नगर परिषदेच्या संबंधित विभागांची पंचाईत होत आहे. थकबाकी व मागणीच्या तुलनेत वसुली होत नसल्याने नगर परिषदेला विविध कामे करताना आर्थिक अडचण निर्माण होते. परिणामी त्याचा परिणाम विकास कामांवर पडतो. विशेष म्हणजे, यंदा कोरोनामुळे नगर परिषदेची मालमत्ता कर वसुली चांगलीच घटली. त्यामुळे यंदा थकबाकी व मागणीचा आकडा चांगलाच वाढला असून ती रक्कम काढण्यासाठी आता मालमत्ता कर विभागाला कसरत करावी लागणार आहे. हेच बघून नगर परिषदेने मालमत्ताधारकांना येत्या १० तारखेपर्यंत त्यांच्याकडील थकबाकी भरण्यास कळविले आहे. यासाठी रिक्षातून शहरात मालमत्ता करण्याबाबत आवाहन केले जात आहे. एवढेच नव्हे तर १० तारखेपर्यंत मालमत्ता कर न भरल्यास त्यावर २४ टक्के व्याज लावले जाणार असल्याचेही कळविण्यात आले आहे. 

फक्त १.३५ कोटी रूपये वसुली यंदा नगर परिषदेला मागील थकबाकी व यंदाची मागणी असे एकूण ११ कोटी ३७ लाख दोन हजार २३१ रूपये वसुलीचे टार्गेट आहे. मात्र मालमत्ता कर विभागाकडे आतापर्यंत फक्त एक कोटी ३५ लाख २८ हजार ६३ रूपयेच आले आहेत. म्हणजेच, विभागाला ३ महिन्यांत सुमारे १० कोटी रूपयांची वसुली करायची आहे. एकीकडे मालमत्ता कर विभागाकडे कर्मचाऱ्यांची कमी आहे. त्यातही काही कर्मचारी कोरोना कामात लावण्यात आले असल्याने त्याचाही फटका बसतो. अशात आता मालमत्ता कर विभाग किती वसुली करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Taxकर