शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

सुसज्ज आरोग्य केंद्र होणार

By admin | Updated: February 28, 2017 01:04 IST

मानवाला मुलभूत गरजा पार पाडत असताना आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असते. त्यासाठी ग्रामीण भागात चांगले डॉक्टर्स यावेत, ...

पालकमंत्र्यांची ग्वाही : प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत बांधकामाचे भूमिपूजन तिरोडा : मानवाला मुलभूत गरजा पार पाडत असताना आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असते. त्यासाठी ग्रामीण भागात चांगले डॉक्टर्स यावेत, आरोग्याच्या सोई व्हाव्यात यासाठी या परिसरात पाच कोटी रुपयांची सुसज्ज इमारत प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी तयार होत आहे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. तालुक्यातील ग्राम बेरडीपार (काचेवानी) येथील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार विजय रहांगडाले होते. प्रमुख पाहुणे म्हणू भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, उपाध्यक्ष सुनील पालांदूरकर, माजी आमदार भजनदास वैद्य, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, जि.प. सदस्य रजनी कुंभारे, माजी जि.प. उपाध्यक्ष मदन पटले, पं.स.सभापती उषा किंदरले, उपसभापती किशोर पारधी, पं.स.सदस्य पवन पटले, रमणीक सोयाम, बंडू सोनवाने, शाम बचवानी, डॉ. चिंतामन रहांगडाले, डॉ. वसंत भगत, सरपंच जोत्सना टेंभेकर उपस्थित होते.पुढे बोलतांना बडोले यांनी, अदानीने स्थानिक बेरोजगारी कमी झाली नाही. धापेवाडा योजनेअंतर्गत खळबंदा तलावात पाणी पडणार त्यामुळे सिंचन क्षमता वाढेल व शेतकरी सुखी होतील. सर्वांना घरे यासाठी शासन पंतप्रधान आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजना राबवित आहे तर सगळीकडे सुंदर रस्ते यासाठी पंतप्रधान रस्ता योजना, मुख्यमंत्री रस्ता योजना राबवित आहे. ओबीसींसाठी क्रिमिलीअरची अट साडेचार लाखांवरुन सहा लाख करण्यात आली असल्याचे सांगीतले. तर त्यांनी याप्रसंगी तहसीलदारांना लवकरच समाधान शिबिराचे आयोजन करुन शासकीय योजनांची अंमलबजावणी करावी. शासनाच्या ६० ते ७० योजना असून त्याचा लाभ जनतेला अविलंब मिळाला पाहिजे. त्यासाठी कार्यालयाला चकरा माराव्या लागणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचनाही दिल्या. आमदार रहांगडाले यांनी, आमची सत्ता केंद्र, राज्य व जिल्हा परिषदेत असून विकासासाठी निधी आम्हीच खेचून आणू शकतो. विकासकामासाठी निधीची कमी पडू देणार नाही. या क्षेत्रात रस्त्यांची दुर्दशा झाली असून हे रस्ते दुरुस्तीसाठी जि.प. उपाध्यक्षांनी या रस्त्यांची दुरुस्तीसाठी नियोजन करावे व पालकमंत्र्यांनी यासाठी निधीही द्यावा असी मागणी केली. भाजपा जिल्हाध्यक्ष पटले यांनी, विकास आम्हीच करणार आहोत. यासाठी थोडा वेळ लागेल. करिता धीर धरावा असे सांगितले. संचालन तालुका वैद्यकीय अधिकारी टेंभुर्णे यांनी केले. प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी शाम निमगडे यांनी मांडले. आभार सरपंच जोत्सना टेंभेकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी गावातील नागरिक व आरोग्य सेविकांनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)