शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

संविधान बदलण्याची शक्यता समाप्त

By admin | Updated: December 7, 2015 05:50 IST

स्वातंत्र्यानंतर प्रथमच संसदेत संविधानावर दोन दिवसांपर्यंत चर्चा झाली. ही पूर्णत: समाधानकारक बाब नाही.

गोंदिया : स्वातंत्र्यानंतर प्रथमच संसदेत संविधानावर दोन दिवसांपर्यंत चर्चा झाली. ही पूर्णत: समाधानकारक बाब नाही. तरीसुद्धा संविधान बदलण्याची शक्यता संपली, असेच म्हणावे लागेल. आता तर संविधानात नमूद तरतुदींवर अंमल करण्यासाठी सरकारला बाध्य करायला हवे. यासाठी दलीत, आदिवासी व ओबीसी यांची एकजुट आवश्यक आहे, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीमघाट येथे रविवारी (दि.६) आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. पुढे बोलताना खासदार पटोले यांनी, आतापर्यंत अनेकदा संविधानात संशोधन करण्यात आले. परंतुु एकदा पुन्हा हे संशोधन वंचित घटकांच्या हितार्थ झाले नाही. राज्यकर्त्यांनी देशातील सर्वाधिक लोकसंख्येला निंद्रावस्थेतच ठेवण्याचे प्रयत्न केले आहेत. आता आम्हाला जागे व्हावे लागेल असे मत मांडले.कार्यक्रमाला आमदार गोपालदास अग्रवाल, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, नगराध्यक्ष कशिश जायसवाल, माजी नगराध्यक्ष के.बी. चव्हाण, भारतीय बौद्ध महासभेचे सी.झेड. गजभिये, विश्व हिंदू परिषदेचे राम पुरोहित, कॉस्ट्राईबचे सतीष बंसोड, माजी प्रशासकीय अधिकारी अशोक बोरकर, अरूण गजभिये, राजेश चतुर, नीलम हलमारे, वामन गेडाम, कमल बोंबार्डे, प्रदीप ठवरे, एस.डी. महाजन, राजीव ठकरेले, पीपचंद फुले व इतर उपस्थित होते. नगराध्यक्ष जायस्वाल यांनी, आतापर्यंत भीमघाटच्या सौंदर्यीकरणाला नगर परिषदेने नजरअंदाज केले. परंतु आता प्राधान्यतेने याकडे लक्ष दिले जाणार असल्याचे सांगीतले. प्रास्ताविक भीमघाट स्मारक समितीचे अध्यक्ष श्याम चौरे यांनी मांडले. कार्यक्रमासाठी लक्ष्मीकांत डहाटे, किशोर मेश्राम, सुशीला भालेराव, अशोक बोरकर, अजय चौरे, विलास वासनिक, विकास शेंडे, जयंत कुंभलवार, प्रदीप ठवरे, किशोर गजभिये, श्यामकुमार गणवीर, गौतम शेंडे, धनंजय वैद्य, चंद्रशेखर सुखदेवे व अनेकांनी सहकार्य केले. विशेष म्हणजे, बाबसाहेबांच्या अस्थिंना वंदन करण्यासाठी अनुयायांची गर्दी उसळली होती. (प्रतिनिधी)२५ लाखांचा निधी देण्याची घोषणा ४ खासदार निधीतून २५ लाख रूपये भीमघाटच्या सौंदर्यीकरणासाठी उपलब्ध करवून देण्याची घोषणा आयोजित कार्यक्रमात बोलताना खासदार नाना पटोले यांनी केली. विशेष म्हणजे यापूर्वीही त्यांनी ही घोषणा केली होती.