अखेर ‘त्या’ दोन शेतकऱ्यांचा दंड माफ होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 05:00 AM2020-06-06T05:00:00+5:302020-06-06T05:00:39+5:30

गोेरेगाव येथे एक कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने शहरातील एका वार्डात कंटेन्मेंट झोन घोषीत करण्यात आले आहे. दरम्यान याच भागातील दोन शेतकरी त्यांचे ट्रॅक्टरमधील धान पावसामुळे भिजू नये यासाठी ताडपत्री झाकण्यासाठी गेले होते. मात्र नगर पंचायतने नियमाचे उल्लंघन केले म्हणून या दोन शेतकऱ्यांवर प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड आकारला. तसेच त्यांना नोटीस बजावून दंडाची रक्कम चौवीस तासात भरण्याचे निर्देश दिले होते.

In the end, the fines of 'those' two farmers will be waived | अखेर ‘त्या’ दोन शेतकऱ्यांचा दंड माफ होणार

अखेर ‘त्या’ दोन शेतकऱ्यांचा दंड माफ होणार

Next
ठळक मुद्देलोकमतच्या वृत्ताची दखल : शेतकऱ्यांनी मानले लोकमतचे आभार

लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : शहरातील प्रतिबंधीत क्षेत्रातील दोन शेतकऱ्यावर नगर पंचायतने ठोठावलेला प्रत्येकी पाच हजाराचा दंड लोकमत ने शुक्रवारच्या (दि.५) अंकात यासंबंधीचे वृत्त प्रकाशित करताच तो माफ करण्याचा निर्णय नगर पंचायतने घेतला. दरम्यान या प्रकारावरुन आ.विजय रहांगडाले यांनी सुध्दा नगर पंचायतच्या अधिकाऱ्यांना चांगले धारेवर धरले. तर जिल्हाधिकाऱ्यांनी सुध्दा शुक्रवारी सकाळी गोरेगाव येथे पोहचत या प्रकारची चौकशी करुन आढावा घेतला.
गोेरेगाव येथे एक कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने शहरातील एका वार्डात कंटेन्मेंट झोन घोषीत करण्यात आले आहे. दरम्यान याच भागातील दोन शेतकरी त्यांचे ट्रॅक्टरमधील धान पावसामुळे भिजू नये यासाठी ताडपत्री झाकण्यासाठी गेले होते. मात्र नगर पंचायतने नियमाचे उल्लंघन केले म्हणून या दोन शेतकऱ्यांवर प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड आकारला. तसेच त्यांना नोटीस बजावून दंडाची रक्कम चौवीस तासात भरण्याचे निर्देश दिले होते. नगर पंचायतच्या या कायवाईमुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये प्रचंड रोष व्याप्त होता. लोकमतने शेतकऱ्यांवरील कारवाईचा मुद्दा लावून धरला तसेच शुक्रवारच्या (दि.५) अंकात यासंबंधीचे वृत्त प्रकाशित केले. यामुळे नगर पंचायत प्रशासनात एकच खळबळ उडाली. लोकमतच्या वृत्ताची दखल घेत आ. रहांगडाले आणि जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी गोरेगाव पोहचत या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला. तसेच नगर पंचायतच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत शेतकऱ्यांवर कुठल्या आधारावर दंड आकारला याची विचारणा केली. यावर ते निरुत्तरीत झाले. तसेच शेतकऱ्यांवर आकारलेला दंड रद्द करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे आकारलेला दंड रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी नगराध्यक्ष आशिष बारेवार, मुख्याधिकारी हर्षिला राणे, उपाध्यक्ष सुरेश रहांगडाले, बांधकाम सभापती रेवेंद्रकुमार बिसेन, नगरसेवक हिरालाल रहांगडाले उपस्थित होते. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांसह गोरेगाव येथील कंटेन्मेंट झोन आणि बफर झोनची पाहणी करुन माहिती घेतली. तसेच या भागातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. नगर पंचायतकडून सोयी सुविधा पुरविल्या जात आहे किंवा नाही याची सुध्दा त्यांनी या वेळी चाचपणी केली.
नगर पंचायत दंडाची कारवाई केलेल्या ओमप्रकाश ठाकूर व भुवन ठाकूर या दोन शेतकऱ्यांसह इतर शेतकरी आणि कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांनी त्यांची समस्या लावून धरल्याबद्दल लोकमतचे आभार मानले.

Web Title: In the end, the fines of 'those' two farmers will be waived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.