शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसामुळे मिरचीच्या पिकाला फटका

By admin | Updated: January 7, 2015 22:56 IST

अर्जुनी-मोरगाव तालुक्यांतर्गत केशोरी परिसर हा मिरची पिकासाठी जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात प्रसिद्ध आहे. येथील मिरची अमेरिकासारख्या देशात सुद्धा जावू लागली आहे. मात्र गेल्या आठवड्यात

केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यांतर्गत केशोरी परिसर हा मिरची पिकासाठी जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात प्रसिद्ध आहे. येथील मिरची अमेरिकासारख्या देशात सुद्धा जावू लागली आहे. मात्र गेल्या आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे मिरची पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. मिरची उत्पादक शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र परिसरात फेरफटका मारल्यानंतर दिसून आले.या परिसरात धान पिकांवर मोठ्या प्रमाणात मिरचीचे पिक घेतल्या जाते. गेल्या आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे मिरचीचे झाडावरील आलेला फुलोर गळून पडला. जोमात आलेल्या मिरचीच्या झाडावरील फुलोरा नाहीसा झाला आहे. त्याच बरोबरच बुरशी जन्य रोगांचा प्रार्दुभाव वाढल्याचे उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. मिरची पिकाची पाणे सुद्धा पिवळी होऊन गळू लागली आहेत. यामुळे मिरचीच्या उत्पन्नात घट येणार असल्याने मिरची उत्पादक शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. केशोरी आणि परिसरात मिरची पिक हे प्रमुख पिक असून मिरची रोपांच्या लागवडीपासून मिरची उत्पादक शेतकरी मिरची पिकाचे उत्पन्न चांगले येण्यासाठी अत्यंत मेहनतीने कष्ट करीत असतो. परंतु वेळोवळी येणाऱ्या ढकाळ वातावरणामुळे मिरची पिकाचे सतत नुकसान होत असल्याने मिरची उत्पन्नात घट होण्यची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची अवस्था मंभीर झाली आहे. मिरची पिकासाठी लागलेली लागत सुद्धा निघणार नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे मिरची उत्पादकांचे कंबरडे मोरले आहेत. मिरची पिकाचे कितीही नुकसान झाले तरी शासनाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी खंत व्यक्त केली आहे. नुकत्याच पडलेल्या अवकाळी पावसामुळे मिरची पिकाचे झालेल्या नुकसानीचे कृषी विभागाने सर्वेक्षण करुन शेतकऱ्यांनी आर्थिक मदत द्यावी अशी मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. (वार्ताहर)