शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांच्या व्यवहारामुळे संस्था संचालक त्रस्त

By admin | Updated: January 5, 2015 23:07 IST

सहायक निबंधक सहकारी संस्थेत कार्यरत सहकार अधिकारी (श्रेणी दोन) यांचे सहकारी संस्थेचे पदाधिकारी, संचालक व सभासदांसोबत अभद्र व्यवहार करीत असल्यामुळे त्यांत मोठ्या

आमगाव : सहायक निबंधक सहकारी संस्थेत कार्यरत सहकार अधिकारी (श्रेणी दोन) यांचे सहकारी संस्थेचे पदाधिकारी, संचालक व सभासदांसोबत अभद्र व्यवहार करीत असल्यामुळे त्यांत मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त होत आहे. या कार्यालयातील भोंगळ कारभार त्वरीत थांबविण्याची मागणी अनेक संचासकांनी केली आहे.सहकारी संस्थांचे ९७ वे घटनादुरुस्ती पोटनियम मंजूर झालेले आहेत. मात्र या अधिकाऱ्यांनी संस्थेच्या अध्यक्षांना पोटनियमाची प्रत दिलेली नाही. त्यांच्यांकडून घटना दुरुस्ती पोट नियमांच्या प्रत करीता पाच हजार रुपयांची मागणी होत आहे. तसेच नुकतेच झालेल्या नागपूर अधिवेशनाकरीता प्रत्येक संस्थेकडून चार हजार रुपयांची मागणी करण्यात आली. एकूण संस्थांकडून ६० हजार रुपये वसूल करण्यात आल्याची चर्चा आहे. तसेच मजूर संस्था व पाणी वापर संस्थेच्या निवडणुका घेण्यात आल्या. यात पाणी वापर संस्थेकडून प्रत्येकी दोन हजार रुपये अशा ११ संस्थांकडून २२ हजार रुपये व तीन मजूर संस्थांकडून प्रत्येकी चार हजार प्रमाणे १२ हजार रुपये घेण्यात आल्याचे समजते. तालुक्यात ४५ विविध सेवा सहकारी संस्था आहेत. त्यांच्याकडून ९० हजार रुपये वसूल करण्यात आले.ज्या संस्था व्यवस्थित चालू आहेत त्यांच्या अंतरीम अवसायनाचे पत्र देऊन संस्था बंद करण्यात येतील असे धमकी पत्र देणे. तसेच पुन्हा संस्था चालू करायची असेल तर प्रत्येकी तीन हजार घेऊन संस्था चालू करा असे आदेश दिले जातात. एकंदरीत सहकारी संस्था बंद करण्याचा सपाटा या कार्यालयात सुरु झाला आहे. या सहकार अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे सहकारी संस्थेचे पदाधिकारी संचालक व सभासद त्रासून गेले आहेत. विशेष म्हणजे सहायक निबंधक अधिकारी एस.डी. गोस्वामी यांच्याकडे चार तालुक्यांचा कारभार आहे. त्यात आमगाव, तिरोडा, गोरेगाव, सालेकसा या तालुक्यांचा समावेश आहे. अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीत सहायक अधिकारी श्रेणी दोन यांची मनमानी सुरु आहे. त्यांच्या या मनमानी कारभारामुळे मात्र संस्था संचालक व पदाधिकाऱ्यांत चांगलाच रोष खदखदत आहे. त्यामुळे सदर अधिकाऱ्यांचे इतरत्र स्थानांतरण करावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा काही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)