शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ बोअरवेलचे पाणी पिल्याने जिभेचा रंग होतो काळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 05:00 IST

तालुक्यातील बागळबंद जंगल परिसरात गोरेगाव तिरोडा मार्गावर काली माता मंदिर आहे.या मंदिराजवळ एक बोअरवेल आहे. भाविकांना तहान लागल्यास याच बोअवेलचा आधार घेतात. या काली माता मंदिरला लागूनच फुटक्या तलाव आहे. काही वर्षांपूर्वी या तलाव परिसरात लग्न सोहळयासाठी वरात गेली होती. मात्र रात्री उशिर झाल्याने त्या वरातीतील सर्वांनी फुटक्या तलावाजवळ मुक्काम केला होता.

ठळक मुद्देगावकऱ्यांमध्ये कुतुहल, रासायनिक घटकांमुळे परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : तालुक्यातील बागळबंध येथील काली माता मंदिर परिसरातील एका बोअरवेलचे पाणी पिल्याने जिभेचा रंग काळा होत असल्याचा प्रकार पुढे आला आहे. यामुळे गावकऱ्यांकडून वेगवेगळे तर्कविर्तक लावले जात आहे. मात्र बरेच दिवसांपासून बोअरवेलचा वापर बंद असल्याने अथवा रासायनिक घटकांमुळे हे शक्य असल्याचे मत भूजल तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.तालुक्यातील बागळबंद जंगल परिसरात गोरेगाव तिरोडा मार्गावर काली माता मंदिर आहे.या मंदिराजवळ एक बोअरवेल आहे. भाविकांना तहान लागल्यास याच बोअवेलचा आधार घेतात. या काली माता मंदिरला लागूनच फुटक्या तलाव आहे. काही वर्षांपूर्वी या तलाव परिसरात लग्न सोहळयासाठी वरात गेली होती. मात्र रात्री उशिर झाल्याने त्या वरातीतील सर्वांनी फुटक्या तलावाजवळ मुक्काम केला होता. पण त्याच रात्री तलावाची पाळ फुटल्याने अनेक लोकांना जीव गमवावा लागला होता. तेव्हापासूनच त्या तलावाचे नाव फुटक्या तलाव पडल्याचे सांगण्यात येते. या घटनेनंतर पहाडीवर काली मातेचे मंदिर उभारण्यात आले.सद्यस्थितीत काली माता मंदिर परिसरात भक्त येतात. हे काली माता मंदिर जवळपास १५० वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. १९९७ मध्ये पंचायत समितीचे माजी सभापती विजय राणे यांनी या मंदिर परिसरात एका बोअरवेल व्यवस्था करुन दिली. १ आॅक्टोबर रोजी या बाअ‍ेरवेलचे पाणी पिल्याने जिभेचा रंग काळा होत असल्याचा प्रकार पुढे आला. सध्या या प्रकाराची परिसरात चर्चा आहे.बोअरवेलचे पाणी पिल्याने जिभेचा रंग काळा होत असल्याची माहिती गावकºयांकडून मिळाली. हा नेमका काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी बोअरवेलच्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे.- विजय राणे, माजी सभापती गोरेगाव..............................................................बोअरवेलचे पाणी पिल्याने जिभेचा रंग काळा होणे यामागे विविध कारणे असू शकतात. आयोडीन, आयरन, टॉक्झीक मेटल यांचे प्रमाण जास्त असेल तर जिभ काळी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बोअरवेलच्या पाण्याचा कमी वापर होत असेल तर असे होणे शक्य आहे. भूगर्भातील पाणी आणि बोअरवेलचे जंग लागलेले लोखंडी पाईप यात रासायनिक प्रक्रि या झाली असेल तर पाणी पिल्याने जिभेचे रंग काळा होण्याची शक्यता आहे. मात्र पाण्याचे नमुने तपासल्यानंतर नेमका काय प्रकार हे निश्चित सांगता येईल.- दिनेश वाघमारे, केमिस्ट,उपविभागीय प्रयोगशाळा गोरेगाव,भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा गोंदिया.

टॅग्स :Waterपाणी