शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

सायकलभ्रमणातून व्यसनमुक्तीचा संदेश

By admin | Updated: January 4, 2015 23:13 IST

कोणतेही व्यसन नसलेली एकही व्यक्ती नाही असे घर सापडणे आता दिवसेंदिवस कठीण होत आहे. व्यसनाचे दुष्परिणाम माहीत असूनही त्यापासून दूर जाणे प्रत्येकाला शक्य होत नाही.

असेही झपाटलेपण : दोन लाख किलोमीटरचा प्रवास पूर्णत्वाकडेगोंदिया : कोणतेही व्यसन नसलेली एकही व्यक्ती नाही असे घर सापडणे आता दिवसेंदिवस कठीण होत आहे. व्यसनाचे दुष्परिणाम माहीत असूनही त्यापासून दूर जाणे प्रत्येकाला शक्य होत नाही. मात्र व्यसनमुक्तीचा संदेश घेत कर्नाटकातील चिकतिरुपती या गावातील अमरदीप सिंग हे चक्क सायकलने देशभ्रमंती करीत आहेत. गेल्या ८ वर्षांपासून त्यांना या कामाने झपाटले आहे. यातूनच त्यांनी १ लाख ९५ हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे.गेल्या आठ वर्षापूर्वी अमरदीप यांच्या मामाचा व्यसनाच्या आहारी जाऊन मृत्यू झाला. या घटनेने त्यांनी आपल्या आयुष्याचे ध्येयच बदलून टाकले. व्यसनमुक्त भारत करण्याचा संदेश देत अमरदीप सिंग हे आपल्या सायकलने घराबाहेर पडले. त्यांची पत्नी बंगलोरला शिक्षिका आहे तर मुलगा न्युयॉर्कमध्ये डॉक्टर आहे. मध्यप्रदेशमार्गे सिंग गोंदियात पोहोचलेल्या सिंग यांनी सांगितले की, १ जानेवारी २००६ रोजी त्यांनी आपली सायकलयात्रा सुरू केली. व्यसनांचे दुष्परिणाम लोकांना सांगून त्यापासून त्यांना परावृत्त करावे हा एकमेव उद्देश घेऊन त्यांनी ही यात्रा सुरू केली. पदवीधर असलेले अमरदीप मातृभाषा पंजाबीसोबतच कन्नड, तेलुगू, तामिळ, हिंदी आणि इंग्रजी बोलू शकतात. आतापर्यंत त्यांनी २४ राज्यांमधील २५ हजार शाळांना भेट दिली आहे.अमरदीप सिंग हे आपल्या या कामाने इतके झपाटले आहे की ते दररोज १०० किलोमीटरचा प्रवास सायकलने पूर्ण करतात. वाटेत शाळा-महाविद्यालयांना भेटी देतात. विद्यार्थ्यांना, नागरिकांना व्यसन करू नये असा संदेश देतात. दररोज सकाळी उठून ते आपला स्वयंपाकसुद्धा स्वत:च करतात. त्यासाठी लागणारे साहित्यही त्यांच्या सोबत सायकलवरच असते. गेल्या ६ वर्षात त्यांनी ६ सायकली बदलल्या आहेत. सतत प्रवास करताना त्यांना ३५ टायर आतापर्यंत बदलवावे लागले. तसेच १५ ट्युब बदलविले आहेत. आपल्या या प्रवाशात त्यांना काही कटू अनुभवही आले. त्यात त्यांचे एटीएम, कधी पैसे तर कधी इतर साहित्य चोरीला गेले. पण ते त्यातूनही मागे हटले नाही. आपला हा संदेश ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतात. (जिल्हा प्रतिनिधी)गिनिज बुकसाठी नामांकनसिंग यांनी आतापर्यंत १ लाख ९५ हजार किलोमीटरचा प्रवास सायकलने पूर्ण केला आहे. पंजाबमधील अमृतसर येथून त्यांनी हा प्रवास सुरू केला होता. त्यांनी जम्मु-काश्मिर, हरियाणा, नवी दिल्ली, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार, ओरिसा, आंध्र प्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गोवा, दमन दीव, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि महाराष्ट्रातही शाळांना भेटी देत प्रवास केला आहे. यासाठी त्यांचे नाव गिनिज वर्ल्ड रेकॉर्डसाठी नामांकित झाले आहे. मार्च २०१५ मध्ये त्यासाठी त्यांना मुंबईत आमंत्रित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.मुलीच्या लग्नातही हजर राहू शकले नाहीआपल्या या जनजागृती मोहिमेत खंड पडू नये म्हणून सिंग जून २०१२ मध्ये आपल्या मुलीच्या लग्नासाठीही स्वत:च्या घरी गेले नाहीत. त्यांनी केवळ मोबाईल फोनने मुलीला आशीर्वाद दिले. विशेष म्हणजे स्वत:सोबत लॅपटॉप वापरणाऱ्या सिंग यांना जगात होणाऱ्या सर्व घडामोडींची कल्पना आहे. फेसबुक अकाऊंटनेही ते एक हजारावर लोकांशी संपर्कात असतात. विशेष म्हणजे त्यांचे कुटुंबिय त्यांच्या अकाऊंटमध्ये दर महिन्याला पैसे टाकतात.