शिक्षकांच्या प्रश्नांवर शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 05:00 AM2020-07-12T05:00:00+5:302020-07-12T05:00:35+5:30

वेतन दिरंगाई संदर्भातील प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याकरता जिल्हा परिषदेने सीएमपी प्रणालीचा अवलंब करून थेट शिक्षकांच्या खात्यावर जिल्हा परिषद मधूनच वेतन जमा करण्याची मागणी केली असता यावर सर्व शिक्षकांचे खाते उघडून वित्त व कोषागार विभागाशी चर्चा करून सीएमपी वेतन प्रणाली राबवण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल असे सांगीतले. उच्च परीक्षा परवानगी, संगणक सूट व स्थायी प्रकरणे निकाली काढण्यासंदर्भात चर्चा केली असता हिवारे यांनी संबंधित लिपिकाला नस्ती सादर करण्याचे निर्देश दिले.

Discussion with education officials on teacher questions | शिक्षकांच्या प्रश्नांवर शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा

शिक्षकांच्या प्रश्नांवर शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा

Next
ठळक मुद्देशिक्षक समिती शिष्टमंडळाने घेतली भेट, लवकरात लवकर निकाली काढण्याचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने शिक्षकांच्या विविध मागण्यांसंदर्भात शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांच्या दालनात भेट घेऊन चर्चा केली. यावर शिक्षणाधिकारी हिवारे यांनी तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
चर्चेत, १ वर्षापासून प्रलंबित निवड श्रेणी व चटोपाध्यायची प्रकरणे निकाली काढण्याचा विषय शिष्टमंडळाने मांडला. यावर हिवारे यांनी शिक्षण विभाग या प्रश्नासंदर्भात गंभीर असून लवकरच मूल्यमापन समितीची बैठक आयोजित करण्यात येणार असून त्यामध्ये हा मुद्दा निकाली काढला जाईल असे सांगितले. डीसीपीएस-जीपीएफ कपातीचा आजपर्यंतच्या हिशोबावर त्यांनी मार्च २०१४ पर्यंतचा डिसीपीएस हिशोब झालेला असून पावत्या स्वाक्षरीकरीता मुख्य लेखा वित्त अधिकाऱ्यांकडे ठेवण्यात येणार असल्याचे संबंधित लिपीकाने सांगितले. उर्वरीत डिसीपीएस-जीपीएफ शालार्थ प्रणालीद्वारे कपात झालेल्या पैशांचा हिशोबावर शिक्षण विभाग गांभीर्यपूर्वक काम करीत असून माहेवार चालान व शेड्यूल वित्त विभागाला सादर करण्यात येईल, गणवेश निधी तात्काळ मुख्याध्यापकांच्या खात्यावर १०-१५ दिवसात वर्ग करण्यात येईल, सेवानिवृत्ती प्रकरणे वित्त विभागाला सादर करण्यात येईल असे सांगीतले.
वेतन दिरंगाई संदर्भातील प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याकरता जिल्हा परिषदेने सीएमपी प्रणालीचा अवलंब करून थेट शिक्षकांच्या खात्यावर जिल्हा परिषद मधूनच वेतन जमा करण्याची मागणी केली असता यावर सर्व शिक्षकांचे खाते उघडून वित्त व कोषागार विभागाशी चर्चा करून सीएमपी वेतन प्रणाली राबवण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल असे सांगीतले. उच्च परीक्षा परवानगी, संगणक सूट व स्थायी प्रकरणे निकाली काढण्यासंदर्भात चर्चा केली असता हिवारे यांनी संबंधित लिपिकाला नस्ती सादर करण्याचे निर्देश दिले.
जिल्हा परिषद हायस्कूल मधील रिक्त पदे, उच्चश्रेणी मुख्याध्यापकांची रिक्त पदे, पदवीधर विषय शिक्षकांची रिक्त पदे लवकरात लवकर पदोन्नतीने भरण्यासंदर्भात चर्चा केली असता पदविधर विषय शिक्षक विज्ञान विषयाची माहिती संदर्भात पत्रक काढण्यात येईल. तसेच उर्वरित पदोन्नतीची सर्व पदे भरण्यासंदर्भात तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
विषय शिक्षकांना सरसकट वेतनश्रेणी लावण्या संदर्भात चर्चा केली असता शासन नियमानुसार सर्व पात्र शिक्षकांना जिल्हा परिषद कडून वेतन श्रेणी देण्यात येईल व यावरील अंतिम आदेश लवकरच निर्गमित करण्यात येईल असे सांगीतले. १४ वित्त आयोगातून शाळेचे वीज बिल ग्रामपंचायतद्वारे भरण्यासंदर्भातील नस्ती मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
तसेच देवरी येथील उर्वरित एकस्तर प्रकरणे निकाली काढण्यासंदर्भात चर्चा केली असता पुढील आठवड्यात प्रकरणे निकाली काढण्यात येईल असे सांगितले. यावेळी चर्चेत शिक्षक समितीचे किशोर डोंगरवार, संदीप तिडके, जी.एम.बैस, सुधीर खोब्रागडे, प्रफुल्ल भोयर उपस्थित होते.

Web Title: Discussion with education officials on teacher questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक