भक्ती हा ज्ञान केंद्रित करण्याचा उत्तम मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 06:00 AM2020-02-24T06:00:00+5:302020-02-24T06:00:07+5:30

भक्तिमार्गातून चिंतन आणि मनन केल्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे सहज शक्य होईल. विद्यार्थ्यांनी भक्तीभावाने आत्मिक शांती प्राप्त केली तर त्यातून अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे सहजशक्य होईल. कारण भक्ती हा ज्ञान केंद्रीत करण्याचा उत्तम मार्ग असल्याचे प्रतिपादन आमदार विनोद अग्रवाल यांनी केले.

Devotion is a great way to focus knowledge | भक्ती हा ज्ञान केंद्रित करण्याचा उत्तम मार्ग

भक्ती हा ज्ञान केंद्रित करण्याचा उत्तम मार्ग

Next
ठळक मुद्देविनोद अग्रवाल : रतनारा येथील महाशिवरात्री उत्सव

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भक्तिमार्गातून चिंतन आणि मनन केल्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे सहज शक्य होईल. विद्यार्थ्यांनी भक्तीभावाने आत्मिक शांती प्राप्त केली तर त्यातून अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे सहजशक्य होईल. कारण भक्ती हा ज्ञान केंद्रीत करण्याचा उत्तम मार्ग असल्याचे प्रतिपादन आमदार विनोद अग्रवाल यांनी केले.
तालुक्यातील ग्राम रतनारा येथील शिवशक्ती सेवा ट्रस्टच्यावतीने नर्मदेश्वर शिवशक्ती धाम महादेव पहाडी येथे आयोजित महाशिवरात्री उत्सवात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच रेखा चिखलोंढे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून तंटामुक्त समिती अध्यक्ष सुरेश लिल्हारे, ग्रामपंचायत सदस्य धनपाल धुवारे, दुर्योधन भोयर, सतीश दमाहे, चुनीलाल बोरकर, दुर्गा दमाहे, ओमेश्वरी ढेकवार, योगीप्रसाद धामडे, भवरलाल राऊत, मदन चिखलोंडे, आय.सी.बिरनवार, बळीराम बसेने, चैनलाल लिल्हारे, कुवरलाल लिल्हारे, इंद्रराज बसेने, राजेंद्र राऊत, निरंजन बिरनवार, उत्तम चिखलोंढे, लखनलाल दाऊदसरे, चित्तरंजन बिरनवार, निरंजन बिरनवार उपस्थित होते.
याप्रसंगी स्वर्गीय उषादेवी बिरनवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी चैनलाल लिल्हारे, श्रीराम लिल्हारे, दुर्योधन भोयर, फागुलाल लिल्हारे, राजकुमार बसोने, रामेश्वर कोठेवार, भवरलाल राऊत, मंगेश बसोने यांच्यासह ट्रस्ट सदस्यांनी सहकार्य केले.

Web Title: Devotion is a great way to focus knowledge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MLAआमदार