शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

क्षय कर्मचारी भत्ते व वेतनापासून वंचित

By admin | Updated: January 8, 2015 22:58 IST

सुधारित राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात १४ अस्थायी कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना मागील २१ महिन्यांपासून देय असलेला इंधन व दैनिक देण्यात आला नाही

गोंदिया : सुधारित राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात १४ अस्थायी कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना मागील २१ महिन्यांपासून देय असलेला इंधन व दैनिक देण्यात आला नाही. तसेच मागील चार महिन्यांपासून हे कर्मचारी वेतनापासून वंचित आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आली आहे.क्षयरोग हा अत्यंत दुर्धर आजार असून क्षयरूग्णांना मार्गदर्शन व औषधोपचार करणे खूप जोखमीचे काम असते. सुधारित राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत कार्य करणारे हे कर्मचारी अत्यंत जोखमीचे काम करीत असूनही सदर कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर ते डिसेंबर २०१४ या चार महिन्यांचे वेतन थकीत आहे. तसेच एप्रिल २०१३ ते डिसेंबर २०१४ पर्यंतचे दैनिक व इंधन भत्ता देयकही थकीत आहे. त्यामुळे क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमावर विपरित परिणाम होत आहे. सदर अस्थायी-कंत्राटी कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे वेतन अत्यल्प असून सर्व कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता त्याचा परिणाम सुधारित राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमावर पडत आहे.सदर कार्यक्रमांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे एकत्रित असलेले सर्व वेतन, प्रवासभत्ते व इतर भत्ते डिसेंबर २०१४ अखेरसुद्धा मिळाले नाहीत. त्यामुळे १ जानेवारी २०१५ पासून क्षयरूग्णांबाबत कसल्याही प्रकारची रिपोर्टिंग व मिटिंग केली जाणार नाही, असा पवित्रा या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. मात्र सर्व कर्मचारी क्षयरूग्णांना सुविधा देतील व उपचाराबाबत कसलीही हेळसांड केली जाणार नाही, अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्य सुधारित राष्ट्रीय क्षयरोय नियंत्रण कर्मचारी संघटना गोंदियाच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी धकाते, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी गहलोत यांना देण्यात आले आहे. याशिवाय निवेदनाच्या प्रति आरोग्य विभाचे संचालक, मंत्रालय मुंबई यांना पाठविण्यात आल्या आहेत. निवेदनात सर्व क्षय कर्मचाऱ्यांचे आतापर्यंतचे रखडलेले सर्व वेतन व सर्व भत्ते त्वरित देण्यात यावे, अशी मागणी क्षयरोग विभागातील कर्मचारी भोजेंद्र बोपचे, पवन वासनिक, राजू मेश्राम, संजय रेवतकर, हरिश चिंधालोरे, संजय भगवतकर, रामचंद्र लिल्हारे, योगिता अडसड, रिजवाना शेख, पंकज लुतडे, अमित मंडळ, दिनेश डोंगरवार यांनी केली आहे. (प्रतिनिधी)