गोंदिया रेल्वेस्थानकावर कोरोना इफेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 06:00 AM2020-03-19T06:00:00+5:302020-03-19T06:00:21+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे स्थानकावरील खुर्च्या, रॅलिंग आणि पायऱ्यांची दिवसांतून चारवेळा साफसफाई केली जात असून जंतू नाशक फवारणी केली जात आहे. हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक हे एक महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानक असून या रेल्वे स्थानकावर दररोज दीडशेच्या वर रेल्वे गाड्यांची ये-जा होते.

Corona effect on Gondia railway station | गोंदिया रेल्वेस्थानकावर कोरोना इफेक्ट

गोंदिया रेल्वेस्थानकावर कोरोना इफेक्ट

googlenewsNext
ठळक मुद्देदिवसभरात चारवेळा सफाई अभियान : डॉक्टरांची नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्ट्रात झपाट्याने पसरत असलेल्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणेसह सर्व विभाग सुध्दा अर्लट झाले असून उपाय योजना राबविल्या जात आहेत. हावडा-मुंबई मार्गावरील महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानक असलेल्या गोंदिया रेल्वे स्थानकावर सुध्दा कोरोना इफेक्ट दिसून येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे स्थानकावरील खुर्च्या, रॅलिंग आणि पायऱ्यांची दिवसांतून चारवेळा साफसफाई केली जात असून जंतू नाशक फवारणी केली जात आहे.
हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक हे एक महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानक असून या रेल्वे स्थानकावर दररोज दीडशेच्या वर रेल्वे गाड्यांची ये-जा होते. तर जवळपास २५ हजार प्रवाशी दररोज ये-जा करतात. रेल्वे स्थानकावर प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रेल्वे स्थानक व्यवस्थापनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.
रेल्वे स्थानकावरील रॅलिंग, खुर्च्या आणि परिसर पाण्याने दिवसांतून चारवेळा धुतले जात असून जंतूनाशक फवारणी केली जात आहे. तसेच संशयीत रुग्ण आढळल्यास त्याची तपासणी करण्यासाठी रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक १ विशेष कक्ष उघडण्यात आले आहे. तसेच तिथे दोन डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोरोनाची लक्षणे आढळणाºया रुग्णाला या कक्षात पाठवून तपासणी केली जात आहे. रेल्वे रुग्णालयात सुध्दा पाच खाटांचे विशेष कक्ष तयार करण्यात आले आहे. याशिवाय कोरोनाविषयी प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यासाठी पोस्टर आणि जिंगलच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.त्यामुळे सुरूवातीला कोरोना जनजागृती प्रती उदासिन असलेल्या गोंदिया रेल्वे स्थानकावर कोरोना इफेक्ट दिसून येत आहे.

आरक्षण तिकीट रद्द करण्याचे प्रमाण वाढले
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेकांनी बाहेरगावी जाण्याचे केलेले नियोजन आता रद्द केले. एप्रिल महिन्यासाठी केलेले आरक्षण रद्द करण्यासाठी येथील रेल्वे आरक्षण केंद्रात दररोज प्रवाशांची गर्दी वाढत आहे.सोमवार आणि मंगळवारी या दोन दिवसात ६ लाख रुपयांच्या जवळपास ६ आरक्षीत तिकीट रद्द करण्यात आले. तर आरक्षण करणाऱ्यांचे प्रमाण नगण्य आहे.दररोज अडीचशे आरक्षण तिकीटे रद्द होत असल्याची माहिती रेल्वे विभागाचे मुकेश कुमार यांनी दिली.

Web Title: Corona effect on Gondia railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.