शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूला वेळीच नियंत्रित करण्यासाठी सहकार्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2016 01:36 IST

जागतिक डेंग्यू दिवस साजरा $$्निेगोंदिया : एका डासापासून होणार डेंग्यू हा आजार वेळीच काळजी न घेतल्यास जीवावर बेततो.

गहलोत यांचे आवाहन : जागतिक डेंग्यू दिवस साजरा $$्निेगोंदिया : एका डासापासून होणार डेंग्यू हा आजार वेळीच काळजी न घेतल्यास जीवावर बेततो. त्यामुळे या आजाराची वेळीच रोखधाम करणे गरजेचे असून यासाठी डासांची उत्पत्ती होऊ न देणे हे गरजेचे आहे. करिता डेंग्यूच्या रोकथामासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राज गहलोत यांनी केले. जिल्हा आरोग्य प्रशासनाच्यावतीने बुधवारी (दि.१८) जिल्हा परिषद आरोग्य भवन सभागृहात आयोजीत ‘जागतीक डेंग्यू दिन’ कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गहलोत यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सहायक जिल्हा हिवताप अधिकारी बींझाडे, साथरोग अधिकारी डॉ. पटले, गुप्ता, बिसेन, आरोग्य विस्तार अधिकारी दिलीप कुंभरे, ठाकुर, शुक्ला वानखेडे व बहुसंख्येत आरोग्य सहायक सहाय्यीका आरोग्य कर्मचारी-अधिकारी हजर होते. प्रास्ताविक मार्गदर्शन करताना बिंझाडे यांनी, जिल्ह्यातील मागील ३ वर्षात जिल्ह्यातील डेंग्यू नियंत्रण कार्यक्रमात आकडेवारी समाधानकारक असली तरी यंदाच्या पावसाळ्याच्या अंदाजावरुन यावर्षी डेंग्यू सदृश्य रुग्णाच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे निदर्शनात आणून दिले. मागील वर्षी डेंग्यू रोगाचे एकही रुग्ण जिल्ह्यात न आढळून आल्याबद्दल जिल्ह्यातील सर्व कर्मचारी-अधिकारी वर्गाचा प्रयत्नाबद्दल त्यांचा अभिनंदन करुन सम्मानित नागरिकांचे आभार व्यक्त केले. संचालन जिल्हा हिवताप कार्यालयाचे किटक समाहरक किशोर भालेराव यांनी केले. आभार आत्माराम वंजारी यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील आरोग्य सहाय्यक, सहाय्यीका तसेच आरोग्य अधिकारी, तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा हिवताप कार्यालय कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)