शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

पैसे भरूनही कनेक्शन कापले

By admin | Updated: January 4, 2015 23:14 IST

पैसे भरल्यानंतरही त्याची पावती नसल्याच्या कारणातून तालुक्यातील ग्राम माल्हीच्या ग्राम पंचायतने १४ ग्राहकांचे नळ कनेक्शन कापले. मागील चार दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या कारवाईने

आमगाव : पैसे भरल्यानंतरही त्याची पावती नसल्याच्या कारणातून तालुक्यातील ग्राम माल्हीच्या ग्राम पंचायतने १४ ग्राहकांचे नळ कनेक्शन कापले. मागील चार दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या कारवाईने नागरिकांत मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जात आहे.या नागरिकांचे नळ कापण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे यांनी अनामत रक्कम एक हजार रुपये व वार्षिक ४२० रुपये ग्रामापंचायत कार्यालयात भरले नाही. यामुख्य कारणामुळे मागील महिन्यात झालेल्या मासिक सभेत निर्णय होऊन त्यांना नोटीस देण्याचे व नंतर नळ कनेक्शन कापण्यात येईल असे मासिक सभेत ठरले. सभेत ठरल्यानुसार गावातील रोशन पारधी, ताराचंद चुटे, महादेव पारधी, मालन सयाम, माधोराव कठाणे, बाबूराव रहिले यांच्यासह १४ नळ कनेक्शनधारकांना नोटीस देण्यात आले. नंतर या १४ जणांचे पैसे नळ कनेक्शनकरिता भरल्याची नोंद किंवा पावती कापण्यात आली नाही, असा ठपका ठेऊन त्यांचे नळ कापण्यात आले. विशेष म्हणजे या १४ जणांकडे सुमारे एक वर्षापासून नळ सुरू होते. जर यांनी पैसे भरले नाही तर ग्रामपंचायतने त्यांना नळ कनेक्शन कसे दिले, हा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित झाला आहे. नळ प्राधिकरण विभागामार्फत ग्रामपंचायतला पाणी पुरवठा देण्यात आला आहे. नियमाप्रमाणे नळ कनेक्शनसाठी अगोदर अनामत रक्कम भरून पावती घ्यावी लागते. जर वरिल १४ नागरिकांनी पैसे भरले नाही तर त्यांना एक वर्षापूर्वी नळ कनेक्शन कोणाच्या परवानगीने देण्यात आले. तसेच एक वर्ष त्यांनी पिण्याचे पाणी कशाप्रकारे उपयोगात आणले. तेव्हा ग्रामपंचायतच्या लक्षात हे अवैध नळ कनेक्शन लक्षात का आले नाही. आताच हा मुद्दा उपस्थित करून नागरिकांचे नळ कनेक्शन का कापण्यात आले अशा चर्चांना गावात पेव फुटले आहे. या नागरिकांनी नळ कनेक्शनचे पैसे दिले. मात्र त्या पैशांची रसीद किंवा नोंद घेण्यात आली नाही. यात १४ नागरिकांचे प्रत्येकी एक हजार अनामत रकमेनुसार १४ हजार रुपयांची अफरातफर झाली हे निश्चित आहे. आता गावात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. मात्र नागरिकांकडे पैसे दिल्याची नोंद किंवा पावती नसल्याने मासिक सभेत ठराव घेऊन नळ कनेक्शन कापण्यात आल्याने नागरिकात व्यापक रोष निर्माण झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)