शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

थंडी व पावसात चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 06:00 IST

मागील आठवड्याभरात जिल्ह्याचा पारा ५ अंशावर गेला होता. बोचरी थंडी व त्यात अवकाळी पाऊस बरसत असल्यामुळे घरात बसून राहणेही कठीण होत आहे. थंडी बघता जागोजागी शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव केला जात आहे. मागील आठवड्यापासून सातत्याने थंडी व पावसाचा जोर कायम असून असे हे वातावरणा लहान मुले व वृद्धांसाठी फारच कठीण असते.

ठळक मुद्देशाळांना सुटी देण्याची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : २६ डिसेंबरपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसू लागला आहे. परिणामी थंडीचा जोर वाढला असून पारा ५ अंशांवर पोहोचला होता. बोचऱ्या थंडीमुळे सर्वांचेच हाल होत असतानाही चिमुकल्यांना शाळेत जावे लागत आहे. मात्र त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून शाळांना प्रशासनाकडून सुटी देण्यात आली नाही. परिणामी आता जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेत थंडी व अवकाळी पाऊस बघता शाळांना सुटी जाहीर करावी, अशी मागणी जोर धरत आहे.मागील आठवड्याभरात जिल्ह्याचा पारा ५ अंशावर गेला होता. बोचरी थंडी व त्यात अवकाळी पाऊस बरसत असल्यामुळे घरात बसून राहणेही कठीण होत आहे. थंडी बघता जागोजागी शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव केला जात आहे. मागील आठवड्यापासून सातत्याने थंडी व पावसाचा जोर कायम असून असे हे वातावरणा लहान मुले व वृद्धांसाठी फारच कठीण असते. असे असतानाही मात्र जिल्ह्यातील शाळांकडून वातावरण बघता सुटी जाहीर करण्यात आली नाही. परिणामी सकाळी उठून चिमुकल्यांना शाळेची धाव घ्यावी लागत आहे.इयत्ता १ ते ४ पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वय लक्षात घेता आजचे हे वातावरण त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचे आहे. मात्र शाळांना सुटी नसल्याने माय-बाय त्यांना शाळेत धाडत आहेत. अगोदरच थंडी आहे, त्यात पाऊस अधिकच भर घालत असल्याने हात-पाय गारठत आहेत. या वातावरणाला बघता भलेभले घराबाहेर निघणे टाळत असून घरातही गरम कपड्यांत दडून बसत आहेत. असे असताना मात्र शाळा संचालक व जिल्हा प्रशासनाला चिमुकल्यांच्या आरोग्याशी कसलेच घेणे-देणे नसल्याचे दिसत आहे.वातावरण बघता शाळांना काही दिवस सुटी जाहीर करावी अशी मागणी पालकांसह सुज्ञ नागरिक करीत आहेत.विशेष म्हणजे, जिल्हाधिकाºयांनी याकडे लक्ष देत निर्णय घेण्याची गरज आहे.वज्रघात, गारपीट व पावसाचा इशाराहवामान खात्याकडून मागील आठ दिवसांपासून पाऊस, वीज व गारपीटीचा इशारा दिला जात आहे. त्यानुसार, शुक्रवारीही (दि.३) वज्रघात, गारपीट व पावसाचा इशारा देण्यात आला आहे. असे असतानाही जिल्हा प्रशासनाने चिमुकल्यांचे आरोग्य व त्यांनी सुरक्षा लक्षात घेता सुटी जाहीर करण्याची गरज आहे. खासगी शाळांकडून स्वमर्जीने सुटी जाहीर केली जाणार नाहीच. मात्र जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे असून काय तो निर्णय त्वरीत घेण्याची गरज आहे.

टॅग्स :Rainपाऊस