शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
3
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
4
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
5
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
6
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
7
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
8
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
9
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
10
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
11
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
12
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
13
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
14
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
15
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
16
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
17
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
18
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
19
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
20
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
Daily Top 2Weekly Top 5

ड्रोनव्दारे गोंदिया रेल्वेस्थानकावर करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:00 IST

गोंदियात आलेल्या या चमूने गोंदिया रेल्वे स्थानक परिसराची पाहणी केली. गोंदिया रेल्वे स्थानकावर किती गर्दी असते याचे चित्रकरण करण्यात आले. सुरक्षा करण्यासाठी ही चित्रीकरण करण्यात आले.ह्या चित्रीकरण्याच्या माध्यातून सुरक्षा करण्यात येणार आहे. चित्रीकरण करतांना रेल्वे सुरक्षा दलाचे जवान उपस्थित होते. गोंदिया रेल्वेस्थानकावर रेल्वे गाड्या येतांनाही त्याचे चित्रीकरण करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील रेल्वेस्थानकावर विमानतळासारखी कडक सुरक्षा देण्यासाठी २९ व ३० सप्टेंबरला ड्रोनच्या माध्यामातून गोंदिया रेल्वे स्थानकाची सुरक्षेची पाहणी करण्यात आली. यासाठी नागपूरवरून ड्रोनसह एका चमूला पाचारण करण्यात आले होते.गोंदियात आलेल्या या चमूने गोंदिया रेल्वे स्थानक परिसराची पाहणी केली. गोंदिया रेल्वे स्थानकावर किती गर्दी असते याचे चित्रकरण करण्यात आले. सुरक्षा करण्यासाठी ही चित्रीकरण करण्यात आले.ह्या चित्रीकरण्याच्या माध्यातून सुरक्षा करण्यात येणार आहे. चित्रीकरण करतांना रेल्वे सुरक्षा दलाचे जवान उपस्थित होते. गोंदिया रेल्वेस्थानकावर रेल्वे गाड्या येतांनाही त्याचे चित्रीकरण करण्यात आले. त्यामुळे गोंदिया रेल्वे स्थानकावर किती गर्दी असते याचा आढावा घेण्यात आला. सुरक्षेच्या दृष्टीने वर्षातून दोन वेळा चित्रीकरण करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.इतवारी-भंडारा रोड रेल्वेस्थानकाचे यापूर्वीच ड्रोनच्या माध्यामातून चित्रीकरण करण्यात आले. गोंदिया व्यतिरिक्त डोंगरगडचेही ड्रोनच्या माध्यमातून चित्रीकरण करण्यात आल्याची माहिती आहे. ही व्हिडीओग्राफी केल्यानंतर ती व्हिडीओ रेल्वे बोर्डला पाठविले जाते.सुरक्षेच्या दृष्टीकोणातून हे चित्रीकरण करण्यात येते. गर्दीमुळे सुरक्षा ठेवली जावी यासाठी ड्रोनच्या माध्यमातून चित्रीकरण करण्यात येते.विमानतळासारख्या सुरक्षेसाठी पाऊल२९ सप्टेंबरपासून गोंदिया रेल्वेस्थानकावर विमानतळासारखी सुरक्षा देण्यात येत आहे. या सुरक्षेला घेऊन रेल्वेस्थानकाच्या रेलटोली परिसरातील पादचारी पूल सुरू आहे. तर बाजार परिसरातील पादचारी पूल सामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आला आहे. बाजार परिसरातील प्रवाश्यांसाठी रेल्वेस्थानकाचा मुख्यद्वार ये-जा करण्यासाठी खुले आहे. कुडवा लाईन परिसरातील रेल्वे पुलावरून प्रवाश्यांना बाहेर निघण्याची सुविधा आहे. परंतु आत येण्यासाठी सदर पुलाचे दोन्ही गेट बंद करण्यात आले आहे. या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी नागपूरवरून आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चमूने केली. या रेल्वेस्थानकाला विमानतळासारखी सुरक्षा देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

टॅग्स :Socialसामाजिक