सौर ऊर्जेपासून बिरसी विमानतळ करणार ३६ लाख युनिट वीज निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 06:00 AM2019-11-02T06:00:00+5:302019-11-02T06:00:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : तालुक्यातील बिरसी येथील विमानतळ प्राधिकरणाने १६० केव्हीचा सौर ऊर्जेचा प्रकल्प उभारुन विजेच्या खर्चात बचत ...

Birsi Airport will generate 36 lakh units of electricity from solar power | सौर ऊर्जेपासून बिरसी विमानतळ करणार ३६ लाख युनिट वीज निर्मिती

सौर ऊर्जेपासून बिरसी विमानतळ करणार ३६ लाख युनिट वीज निर्मिती

Next
ठळक मुद्दे२२० केव्हीच्या प्रकल्पाचे काम सुरू : ४० लाख रुपयांची होणार बचत : वर्षाकाठी १ कोटी १० लाखांचा खर्च

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तालुक्यातील बिरसी येथील विमानतळ प्राधिकरणाने १६० केव्हीचा सौर ऊर्जेचा प्रकल्प उभारुन विजेच्या खर्चात बचत केली. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर विमानतळ प्राधिकरणाने २२० केव्हीच्या सौर ऊर्जाचे प्रकल्पाचे काम सुरू केले. या प्रकल्पातून वर्षाकाठी ३६ लाख युनिट वीज निर्मिती होणार असल्याने विमानतळ प्राधिकरणाला वर्षाकाठी ४० लाख रुपयांची बचत करणे शक्य होणार आहे.
बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ असून येथे पायलट प्रशिक्षण केंद्र सुध्दा आहे.तर लवकरच या विमानतळावरुन प्रवाशी विमान वाहतूक सेवा सुरू होणार आहे. गोंदिया जिल्ह्याला मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याची सीमा लागू असल्याने या विमानतळाला विशेष महत्त्व येणार आहे. सध्या येथील विमानतळावर एअर ट्रॉफीक कंट्रोल आणि इतर कामासाठी मोठ्या प्रमाणात विजेचा वापर केला जातो. यामुळे विमानतळ प्राधिकरणाला महिन्याकाठी १० लाख रुपयांचा वीज बिलाचा खर्च येतो. तर वर्षाकाठी जवळपास १ कोटी १० लाख रुपये विजेच्या बिलापोटी विमानतळ प्राधिकरणाला द्यावे लागतात. विजेचा खर्च कमी करण्यासाठी काही महिन्यापूर्वीच प्राधिकरणाने विमानतळालगत १६० केव्हीचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारला. यातून ८५० युनिट वीज निर्मिती केली जात आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर आता विमानतळ प्राधिकरणाने २२० केव्हीचा दुसरा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू केले आहे. या प्रकल्पाचे काम सध्या प्रगती पथावर असून येत्या दोन तीन महिन्यात हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. या प्रकल्पातून वर्षाकाठी ३६ लाख युनिट वीज निर्मिती केली जाणार आहे.यामुळे प्राधिकरणाला वर्षाकाठी ६० लाख रुपयांची बचत करणे शक्य होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गोंदिया येथील रेल्वे स्थानकावर सुध्दा सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती केली जात असून आता तोच कित्ता बिरसी येथील विमानतळ प्राधिकरणाने गिरविल्याने सौर ऊर्जेकडे कल वाढत असल्याचे चित्र आहे.

बचत झालेला पैसा विकास कामांसाठी
सौर ऊर्जा प्रकल्पातून निर्माण होणाºया विजेमुळे बिरसी विमानतळ प्राधिकरणाला वर्षाकाठी ४० लाख रुपयांची बचत करणे शक्य होणार आहे. त्यामुळे बचत झालेल्या पैशाचा वापर हा प्राधिकरण विकास कामांवर खर्च करणार असल्याची माहिती आहे.
इतर प्रकल्पांनी घ्यावा आदर्श
गोंदिया रेल्वे स्थानक, बिरसी विमानतळ प्राधिकरणाने सौर ऊर्जेपासून निर्मिती विजेचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. वीज बिलावर होणाऱ्या खर्चाची बचत करणे शक्य झाले आहे.तसेच विजेवर अवलंबून राहावे लागणार नाही. त्यामुळे जिल्हा इतर प्रकल्पांनी सुध्दा याचा आदर्श घेण्याची गरज आहे.

Web Title: Birsi Airport will generate 36 lakh units of electricity from solar power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.