शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

एकाच लाभार्थीला दोन वेळा दिला लाभ

By admin | Updated: November 20, 2014 22:55 IST

गोंदिया पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सोनपुरी ग्राम पंचायतचे इंदिरा आवास योजनेंतर्गत एकाच लाभार्थीला दुसऱ्यांदा घरकुल योजनेचा लाभ मिळवून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

परसवाडा : गोंदिया पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सोनपुरी ग्राम पंचायतचे इंदिरा आवास योजनेंतर्गत एकाच लाभार्थीला दुसऱ्यांदा घरकुल योजनेचा लाभ मिळवून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणात सरपंच व ग्रामसेवक एस.एस.गौतम यांनी चिरमिरी घेतल्याचा आरोप ग्राम पंचायत सदस्यांनी केला आहे. इंदिरा आवास घरकुल योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील अतीगरजू, गरीब, भूमिहिन, ज्यांचे घरच नाही व घर जीर्ण असून ज्यांची घर बांधणीची क्षमता नाही अशांची यादी ग्रामसभा घेऊन त्यावर शिक्कामोर्तब करुन पंचायत समितीला पाठविली जाते. पण यादीत २००२ मध्ये ज्या लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात आला त्यांची नावे दुसऱ्यांदा समाविष्ट करून पाठविण्यात आली. सन २०१३-१४ मध्ये ८६ लाभार्थीची यादी पाठविण्यात आली. त्यात ८१ बी.पी. एल. सर्वसाधारण व पाच अनु. जातीचे असून काही लाभार्थ्यांना २००५-०६ च्या इंदिरा आवास प्रतीक्षा यादीतूनही लाभ मिळाला आहे. त्यांचे नाव वगळणे व यादीतुन कमी करणे हे ग्रामसेवक गौतम यांचे काम होते. पण त्यांनी वगळले नाही परिणामी त्यांना दुसऱ्यांदा योजनेचा लाभ मिळाला असून घरकुलांचे आजघडीला काम सुरु आहे. अशांत सुरज पोतण पटले सोनपुरी (पोलटोला) बीपीएल क्र. १०, देबीलाल पोतन पटले बीपीएल -१८, नानाजी शिवदास वैद्य (चन्नदाबाई)बीएल क्र. ९८, राधेलाल चरण कोहरे-बपीएल क्र.६३, सुभाष हरिदास मेश्राम बीपीएल -९५, नरेंद्र बिसराज वैद्य-बीपीएल-९२, धनीराम गरीबा वैद्य (कोसल्या) बीपीएल क्र.८७, हरतीमा मोतीराम मेश्राम बीपीएल क्र. ८८, बसतराम मोहणलाल बीपीएल क्र. १४,धनराज रघुनाथ आडकने बीपीएल -५० यांचा समावेश आहे. यांच्यासाठी मात्र संजय हरिचंद उके बीपीएल क्र. ६९, नत्थु काशीराम चौरागडे,बीपीएल क्र. ६२, गुणराज भीवाजी नेवारे,बीपीएल क्र.-४१ या अती गरजू, गरीत व बेघरांना हेतुपुरस्सर डावलण्यात आले. याप्रकरणी ग्रामसभेत व मासीक सभेत ग्रां.प. सदस्य नटवरलाल गुजलाल जैतवार यांनी प्रश्न उपस्थित केला असता गौतम यांनी उत्तर दिले नाही. उलट सभा लवकरच गुंडाळून ते वरिष्ठांचे नाव सांगून निघून गेले. घरकुल योजनेत सरपंच व ग्रामसेवक यांनी यादीतील प्रत्येक लाभार्थ्यांकडून १० हजार रुपये घेऊन त्यांची नावे समाविष्ट केल्याचा आरोप जैतवार यांनी केला आहे. तशी तक्रार खंडविकास अधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना केली आहे. संबंधित कर्मचारी अधिकारी यांची चौकशी करुन दोषींवर कार्यवाहीची मागणी जैतवार यांनी केली आहे. कार्यवाही न झाल्यास आत्मदहनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. याप्रकरणी ग्रामसेवक गौतम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल बंद होता. शिवाय ते गावात आठवड्यातुन एकदा येत असल्याचे जैतवार यांनी सांगितले. (वार्ताहर)