रेतीमाफियांवर कारवाईला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 06:00 AM2019-11-21T06:00:00+5:302019-11-21T06:00:21+5:30

अप्पर जिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांनी १८ नोव्हेंबरला तिरोडा तहसीलदारांना पत्र देऊन लोकमतमध्ये प्रकाशीत बातमीचा आधार घेत त्यांच्याकडून यावर स्पष्टीकरण मागविले आहे. रेतीघाटावरुन रेतीचा अवैध उपसा सुरुच ही अतिशय गंभीर बाब असून यापूर्वी कार्यालयाने दिलेल्या पत्राची दखल न घेतल्याने स्थानिक वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित होत आहेत.

Begin to prosecute the sand mafias | रेतीमाफियांवर कारवाईला सुरुवात

रेतीमाफियांवर कारवाईला सुरुवात

Next
ठळक मुद्देमहसूल विभागात खळबळ : रेतीचे तीन ट्रॅक्टर पकडले, जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले पत्र

डी.आर.गिरीपुंजे।
लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : तालुक्यातील रेतीघाटावरुन रेतीचा अवैध उपसा सुरुच, प्रशासनाची बघ्याची भूमिका या मथळ्याखाली लोकमतने १८ नोव्हेंबरला वृत्त प्रकाशीत करताच महसूल विभागात खळबळ उडाली.अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेत तहसीलदारांना पत्र देऊन स्पष्टीकरण मागीतले आहे. पत्र हाती पडताच तहसीलदारांनी रेतीघाटावरुन रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टरवर कारवाई केली.
अप्पर जिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांनी १८ नोव्हेंबरला तिरोडा तहसीलदारांना पत्र देऊन लोकमतमध्ये प्रकाशीत बातमीचा आधार घेत त्यांच्याकडून यावर स्पष्टीकरण मागविले आहे. रेतीघाटावरुन रेतीचा अवैध उपसा सुरुच ही अतिशय गंभीर बाब असून यापूर्वी कार्यालयाने दिलेल्या पत्राची दखल न घेतल्याने स्थानिक वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित होत आहेत. सदर बातमीच्या अनुषंगाने योग्य चौकशी करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल त्वरीत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा तसेच याची प्रतिलिपी जिल्हा खनिकर्म अधिकारी यांना सादर करण्याचे निर्देश दिले आहे. दरम्यान तहसीलदारांच्या हाती हे पत्र पडताच एकच खळबळ उडाली. तालुका प्रशासन जागे झाले व दुसºयाच दिवशी १९ नोव्हेंबरला पहाटे वैनगंगा नदीतून रेतीची अवैध वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयात जमा केले. तालुक्यातील रेतीघाटावरुन रेतीची तस्करी सुरूच असल्याच्या लोकमतच्या वृत्ताला देखील दुजारो मिळाला. घाटकुरोडा येथील वैनगंगा नदीच्या पात्रातून अवैध रेतीची वाहतूक करणाºया तीन ट्रॅक्टरवर महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करुन साडेतीन लाख रुपयाचा दंड ठोठावला. १९ नोव्हेंबरच्या पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास वैनगंगा नदीच्या पात्रातून रेती चोरी होत असल्याची माहिती मिळाली. यानंतर नायब तहसीदलार राजेंद्र वाघचौरे, तलाठी आनंद भुते, वासुदेव जायभाये, अजय बिसेन, पोलीस कर्मचारी रोशन गोंडाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली असता वैनगंगा नदीपात्रात तीन ट्रॅक्टरमध्ये मजुरांकडून रेती भरतांना दिसून आल्याने पंचनामा करुन तिन्ही ट्रॅक्टर जप्त करुन तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. यात रमन मेश्राम यांच्या मालकीचा ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५/जी-७५३५ चा चालक रोहीत रुपचंद भोंगाडे, मनिष भांडारकर यांच्या मालकीचा ट्रॅक्टर क्रंमाक एम. एच.३५ जे-२१२४ चा चालक रविंद्र मेश्राम, रक्षपाल भोंगाडे यांच्या मालकीचा विना नंबरचा ट्रॅक्टर चालक विलास डोंगरवार यांना ताब्यात घेऊन ट्रॅक्टर जप्त करुन तिरोडा येथील तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. अवैध रेतीचा उपसा करण्यावर बंदी करण्यात यावी, तसेच घरकुलाकरीता लागणारी रेतीसाठी परवानगी देण्यात यावी अशी जनतेची मागणी आहे.

Web Title: Begin to prosecute the sand mafias

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sandवाळू