पुन्हा तीन गावांनी केली गावबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 06:00 AM2020-03-27T06:00:00+5:302020-03-27T06:00:14+5:30

देशात आणि राज्यात कोरोना आजाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे सर्वत्र लॉक डाऊनचे चित्र आहे. ग्रामीण भागात सुध्दा कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाय योजना करीत आहेत. स्थानिक ग्रामपंचायतींनी सुध्दा यासाठी पुढाकार घेतला असून गावात डासनाशक फवारणी व स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरूवात केली आहे.

Again, three villages were closed down | पुन्हा तीन गावांनी केली गावबंदी

पुन्हा तीन गावांनी केली गावबंदी

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना : गावकरी होत आहेत सजग

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आपल्या गाव परिसरात कोरोना प्रादुर्भाव होऊ नये यासाठी गावकरीच पुढाकार घेत आहेत. बुधवारी गोरेगाव तालुक्यातील दोन गावांनी गावबंदीचा निर्णय घेतला. त्यानंतर गुरूवारी पुन्हा जिल्ह्यातील तीन गावांनी गावबंदीचा निर्णय घेत गावात प्रवेश करणाऱ्या मार्गावर लाकडे आणि झाड्याच्या फांद्या टाकून मार्ग बंद केला.
देशात आणि राज्यात कोरोना आजाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे सर्वत्र लॉक डाऊनचे चित्र आहे. ग्रामीण भागात सुध्दा कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाय योजना करीत आहेत. स्थानिक ग्रामपंचायतींनी सुध्दा यासाठी पुढाकार घेतला असून गावात डासनाशक फवारणी व स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरूवात केली आहे.
गुरूवारी (दि.२६) तिरोडा तालुक्यातील चांदोरी येथील गावकऱ्यांनी गावबंदीचा निर्णय घेत बिहिरीया ते चांदोरी रोड व बिहिरीया ते चांदोरीटोला हे दोन्ही रस्ते बंद केले. तसेच गावात परवानगी न घेता येणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय पोलीस पाटील महानंद पानतावने,सरपंच मदनलाल पटले,उपसरपंच गणेश मेश्राम यांनी घेतला. तर सडक अर्जुनी तालुक्याती बाम्हणी खडकी येथील गावकºयांनी देखील गुरूवारपासून गावबंदी लागू केली.यासाठी गावात प्रवेश करणाºया मार्गावर लाकडे व झाडाच्या फांद्या टाकून मार्ग बंद केला. तसेच कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी हा निर्णय घेतला असून या नियमाचे उल्लघंन घेणाऱ्यावर कारवाही करण्याचा निर्णय सरपंच प्रतिमा कोरे, माजी सभापती विशाल शिवणकर, सोनू खोटेले, मुन्ना ठाकूर,प्रदीप सोनुले,जितेश मेश्राम, नोव्हील हत्तीमारे यांनी घेतला. देवरी तालुक्यातील सिरपूबांध येथील गावकऱ्यांनी सुध्दा गुरूवारी गावबंदीचा निर्णय घेत गावात प्रवेश करणारा मार्ग बंद केला. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गावकरी सुध्दा आता सजग होत असून गावबंदीचा निर्णय घेत आरोग्याची काळजी घेत असल्याचे चित्र आहे.

Web Title: Again, three villages were closed down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.