हत्येनंतर ‘त्या’ महिलेच्या मृतदेहाची लावली विल्हेवाट

By Admin | Updated: October 17, 2015 02:26 IST2015-10-17T02:26:54+5:302015-10-17T02:26:54+5:30

तालुक्यातील मांडोदेवी देवस्थान लगतच्या जंगल व डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या तलावात (ता.१४) एका अनोळखी महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला.

After the assassination, the woman was killed | हत्येनंतर ‘त्या’ महिलेच्या मृतदेहाची लावली विल्हेवाट

हत्येनंतर ‘त्या’ महिलेच्या मृतदेहाची लावली विल्हेवाट

ओळख पटलीच नाही : हत्येच्या दिशेने तपासकार्य
गोरेगाव : तालुक्यातील मांडोदेवी देवस्थान लगतच्या जंगल व डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या तलावात (ता.१४) एका अनोळखी महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. घटनास्थळी मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली असताना प्राथमिक तपासणीत त्या महिलेची हत्या करण्यात आली व नंतर तिचा मृतदेह तलावात फेकण्यात आला असल्याचे उघड झाले आहे.
यामुळे पोलिसांसमोर त्या महिलेची ओळख पटविण्यासह हत्या प्रकरणातील आरोपींना शोधण्याचे एक आवाहन उभे झाले आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद करुन तपास कार्य सुरू झाले आहे.
तालुक्यातील मांडोदेवी देवस्थानात नवरात्रोस्तवाची धामधुम सुरू झाली आहे. भाविकांची चौ बाजूने वर्दळ सुरू झाली आहे. काल (ता.१४) सकाळी एका भाविकाला देवस्थानाकडे जात असाता तलावात एक मृतदेह तरंगताना आढळला. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह बाहेर काढले असता, कुंजलेल्या अवस्थेतील महिलेच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी गोरेगावचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी अधीक्षक डॉ. पी.के. पटले व स्त्रीरोग तज्ज्ञ शिल्पा मेश्राम यांनी केली. दरम्यान महिलेच्या मृतदेहावर पोटात धारदार शस्त्राचे जखमी आढल्या, यावरुन त्या महिलेची हत्या करुन तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने तलावात फेकण्यात आले असल्याची बाब प्राथमिक अंदाजातून उघडकीस आली आहे.
मात्र सदर महिला कोण? हा प्रश्न गोरेगाव पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्या दिशेने पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासकार्य सुरू झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: After the assassination, the woman was killed