आजपासून सुरू होणार अतिरिक्त विशेष प्रवासी रेल्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 05:00 AM2020-06-01T05:00:00+5:302020-06-01T05:00:44+5:30

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूरचे रेल्वे प्रबंधक यांच्याकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार ३ गाड्या तिरोडा, गोंदिया आणि आमगाव रेल्वे स्थानकावरून सुटण्याचे व येण्याचे वेळापत्रक निश्चित केले आहे.

Additional special passenger trains will start from today | आजपासून सुरू होणार अतिरिक्त विशेष प्रवासी रेल्वे

आजपासून सुरू होणार अतिरिक्त विशेष प्रवासी रेल्वे

Next
ठळक मुद्दे३ गाड्यांचे वेळापत्रक निश्चित : गोंदिया, तिरोडा व आमगाव येथे थांबा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी सोमवारपासून (दि.१) गैर श्रमीक नियमित रेल्वे गाड्या सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूरचे रेल्वे प्रबंधक यांच्याकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार ३ गाड्या तिरोडा, गोंदिया आणि आमगाव रेल्वे स्थानकावरून सुटण्याचे व येण्याचे वेळापत्रक निश्चित केले आहे.
गाडी क्रमांक ०२८३३ अहमदाबाद-हावडा ही गाडी तिरोडा येथे १९.२५ वाजता पोहोचून १९.२७ वाजता निघणार, १९.५८ वाजता गोंदिया येथे पोहोचून २० वाजता गोंदिया येथून निघणार व आमगाव येथे २०.१५ वाजता पोहोचून २०.१७ वाजता निघणार आहे. गाडी क्रमांक ०२८३४ हावडा-अहमदाबाद ही गाडी १६.११ वाजता आमगाव येथे पोहोचणार व १३.१३ वाजता निघणार, १६.४१ वाजता गोंदिया येथे येणार १६.४६ वाजता निघणार, तिरोडा येथे १७.०६ वाजता पोहचून १७.८ वाजता पुढील प्रवासासाठी निघणार. गाडी क्रमांक ०२८०९ मुंबई-हावडा विशेष रेल्वे १३.०८ वाजता गोंदिया येथे पोहचेल व १३.१३ वाजता निघणार. गाडी क्रमांक ०२८१० हावडा-मुंबई विशेष रेल्वे गोंदिया येथे १२.२ वाजता पोहोचून १२.४ वाजता निघणार. गाडी क्रमांक ०२०७० गोंदिया-रायगड जनशताब्दी एक्स्प्रेस दुपारी १५ वाजता गोंदिया येथून निघणार तर गाडी क्रमांक ०२०६९ रायगड-गोंदिया जनशताब्दी एक्स्प्रेस दुपारी १३.२५ वाजता गोंदिया येथे पोहचेल.
जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांनी या वेळापत्रकाची नोंद घ्यावी व त्यांच्या मूळ गावी पोहोचण्याकरीता वेळापत्रकानुसार पुढील मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून प्रवास करावा. सदर गाड्यांची तिकीटे फक्त आय. आर. सी.टी.सी च्या संकेतस्थळावर अथवा मोबाईल एॅप्सवर आॅनलाईन पद्धतीने ई-तिकीट स्वरूपात मिळतील. रेल्वे स्थानकावर कोणतीही तिकीटे उपलब्ध होणार नसल्यामुळे रेल्वे स्थानकावर अनावश्यक गर्दी टाळावी. ज्या प्रवाशांचे ई-तिकिट निश्चित झाले आहे. त्यांनाच रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवेश देण्यात येणार आहे. ज्यांची तिकीट निश्चित आहे. त्या प्रवाशांनी गाडी सुटण्याच्या पूर्वी दीड ते दोन तास अगोदर रेल्वे स्थानकावर पोहचायचे आहे.

सर्व प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंग
प्रवासासाठी रेल्वे स्थानकावर येणाऱ्या सर्व प्रवाशांची थर्मल स्क्रीनींग केली जाणार आहे. ज्या प्रवाशांमध्ये कोविड-१९ ची लक्षणे आढळणार नाही त्यांनाच रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांनी प्रवास करताना आपल्यासोबत कमीत कमी साहित्य घेऊन प्रवास करावा. तसेच सर्व प्रवाशांना मास्क लावणे बंधनकारक असून स्थानक आणि गाडीमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे.सर्व प्रवाशांनी शक्यतो आरोग्य सेतू अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करावयाचा असून स्वत:चे भोजन व पाणी सोबत घ्यावे असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्ष डॉ.कादंबरी बलकवडे यांनी कळविले आहे.

Web Title: Additional special passenger trains will start from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे