शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

अपघात विम्याचा दोन कुटुंबांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:00 IST

कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू ओढावतो किंवा काहिंना अपंगत्व येते. अशा अपघातग्रस्त किंवा त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यास किंवा त्यांच्या वारसादारास दोन लाख रुपयांचे संरक्षण दिले जात असून तालुक्यातील दोन शेतकरी कुटुंबांना याचा लाभ मिळाला आहे.

ठळक मुद्देगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा : प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : शेती करताना होणारे अपघात जसे वीज पडणे, पुर येणे, सर्पदंश, विंचूदंश, करंट लागणे इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू ओढावतो किंवा काहिंना अपंगत्व येते. अशा अपघातग्रस्त किंवा त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यास किंवा त्यांच्या वारसादारास दोन लाख रुपयांचे संरक्षण दिले जात असून तालुक्यातील दोन शेतकरी कुटुंबांना याचा लाभ मिळाला आहे.तिरोडा तालुक्यात सन २०१८-१९ मध्ये १० ते ७५ वयोगटातील ४४ हजार २१६ शेतकऱ्यांनी संपूर्ण विमा हप्ता राज्य शासनामार्फत विमा कंपनीला प्रदान केला आहे.१३ शेतकरी व वारसांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर केले. त्यात दोघांना प्रत्येकी दोन लाख असे चार लाख वारसदारांच्या बँक खात्यावर विमा कंपनीने जमा केले असून उर्वरीत प्रोसेसमध्ये असल्याचे सांगितले.अपघाती मृत्यू झालस दोन लाख, अपघातात दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाख, अपघातात एक डोळा-एक अवयव निकामी झाल्यास दोन लाख रूपये देण्यात येते. कुटुंबातील १० ते ७५ वयोगटातील एकूण दोन जनांकरिता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा राबविण्यात येत आहे.या योजनेचा मध्यस्तांना फायदा होवू नये, प्रत्यक्ष शेतकरी कुटुंबालाच फायदा मिळावा या हेतूने तालुका कृषी अधिकारी मंगेश वावधने यांनी आपल्या अधिनस्थ सर्व क्षेत्रीय अधिकारी-कर्मचाºयांना अपघातग्रस्त कुटुंबांचा शोध घेवून त्यांना सर्वतोपरी मदत करुन प्रस्ताव ३ महिन्यांच्या आत तालुका कार्यालयास सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

टॅग्स :Socialसामाजिक