८७ विंधन विहिरींसाठी उन्हाळा संपताना सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2016 01:50 IST2016-05-21T01:50:34+5:302016-05-21T01:50:34+5:30

आता उन्हाळा अंतिम टप्प्यात असताना जिल्हा परिषद अध्यक्षांनी जिल्ह्यात नव्याने ८७ विंधन विहिरी तयार करण्यासाठी सर्व्हेक्षण करण्याचे आदेश

87 Surveys at the end of summer for the dam wells | ८७ विंधन विहिरींसाठी उन्हाळा संपताना सर्वेक्षण

८७ विंधन विहिरींसाठी उन्हाळा संपताना सर्वेक्षण

जिल्हा परिषदेचे वरातीमागून घोडे : तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकार
गोंदिया : आता उन्हाळा अंतिम टप्प्यात असताना जिल्हा परिषद अध्यक्षांनी जिल्ह्यात नव्याने ८७ विंधन विहिरी तयार करण्यासाठी सर्व्हेक्षण करण्याचे आदेश ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला दिले आहेत. त्यामुळे या विंधन विहिरी कधी तयार होतील आणि त्याचा लाभ नागरिकांना कधी मिळणार यावर प्रश्नचिन्ह लागले आहे.
ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत देखभाल दुरूस्ती निधी अंतर्गत जिल्ह्यात कुठे कुठे विंधन विहिरींची गरज आहे याची माहिती जिल्हा परिषदेने आपल्या ठिकठिकाणच्या सदस्यांकडून जानेवारी-फेब्रुवारीतच मागितली होती. त्यानुसार ८७ विंधन विहिरींना जि.प.ने मान्यताही दिली. मात्र मार्च महिन्यात या विंधन विहिरींचे सर्वेक्षण करून प्रत्यक्ष काम सुरू होणे अपेक्षित असताना दोन महिने कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही. आता १० मे रोजी जिल्हा परिषद अध्यक्षांनी त्या विंधन विहिरींच्या सर्व्हेक्षणाचे आदेश ग्रा.पा.पु. विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले.
आता भूजल सर्व्हेक्षण विभागाकडून हे सर्व्हेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी १५ दिवस लागतील, त्यानंतर त्याचा अहवाल मिळून प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल. तोपर्यंत पावसाळ्याला सुरूवात झालेली असेल. त्यामुळे या विंधन विहिरींचा उपयोग पुढील वर्षीच होणार आहे.
जि.प.ने मंजूर केलेल्या विंधन विहिरींमध्ये गोंदिया तालुक्यात २८, आमगाव तालुक्यात १०, देवरी तालुक्यात १०, सालेकसा तालुक्यात ५, गोरेगाव तालुक्यात ९, सडक अर्जुनी ७, अर्जुनी मोरगाव ८ आणि तिरोडा तालुक्यात १० विंधन विहिरींचा समावेश आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: 87 Surveys at the end of summer for the dam wells