शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

२७६ स्रोत भागविणार वन्यप्राण्यांची तहान

By admin | Updated: March 1, 2017 00:18 IST

नवेगाव राष्ट्रीय उद्यान व नागझिरा अभयारण्यासह वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या अभयारण्यात ८ हजार ९३० वन्यप्राण्यांची संख्या

३ वाघ २० बिबट : रानगव्यांची संख्या जास्त गोंदिया : नवेगाव राष्ट्रीय उद्यान व नागझिरा अभयारण्यासह वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या अभयारण्यात ८ हजार ९३० वन्यप्राण्यांची संख्या असून त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी २७६ स्त्रोत आहेत. या स्त्रोतातून वन्यप्राण्यांना पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले. पाण्यासाठी अनेक ठिकाणी सोलरपंप लावण्यात आले आहेत. गोंदिया जिल्ह्याच्या वन्यजीव उपवनसंरक्ष कार्यालयामार्फत नागझिरा अभयारण्य, पिटेझरी, उमरझरी, डोंगरगाव, बोंडे, कोका वन्यजीव अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान असे सात ठिकाण या विभागाकडे येत आहेत. या सात परिसरातील जंगलात असलेल्या वन्यजीवांना उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासू नये यासाठी यासाठी ९७ नैसर्गिक पाणवठे आहेत. परंतु ही पानवठे वन्यप्राण्यांसाठी पुरेसे नसल्याने विविध ठिकाणी १३१ कृत्रीम पानवठे तयार करण्यात आले आहेत, तर ४८ खोदतळे तयार करण्यात आले. वन्यप्राण्यांची तहान भागविता यावी यासाठी ७१ पाणवठ्यावर सोलरपंपची व्यवस्था करण्यात आली असून सर्व पंप सुरळीत सुरु असल्याची माहिती देण्यात आली. या परिसरात ३ वाघ, २० बिबट, १५६ अस्वल, ४ लांडगे, २७७ रानकुत्रे, २ कोल्हे, ३ खवले मांजर, २१ मुगूंस, १ मुसम्याउद, ६ रानमांजर, १० सायाळ, ११७३ रानडुक्कर, १०९२ रानगवे, ९१३ चितळ, ३९६ निलगाय, ३४३ सांबर, १३३ भेडकी, ४ ससे, काळे तोंड असलेले ३ हजार ७७४ माकड, लालतोंडाचे ३१० माकड, २८८ मोर, १ रानकोंबडा असे एकूण ८ हजार ९३० वन्यप्राणी आहेत. या वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय वनविभागाने केली आहे. (तालुका प्रतिनिधी) शिकाऱ्यांवर कॅमेऱ्यांची नजर उन्हाळ्याच्या दिवसात वन्यप्राणी पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी येत असल्याने त्या वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या टोळ्या सक्रिय होतात. पाण्यात विष टाकून वन्यप्राण्यांची शिकार करण्याचेही प्रयोग होतात. पाणवठ्यावर वन्यप्राण्यांची शिकार होऊ नये यासाठी कॅमेरे ही बसविण्यात आले आहेत.