शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

१० ग्रामपंचायतींचे प्रभाग आरक्षण जाहीर

By admin | Updated: February 7, 2015 23:27 IST

तालुक्यातील कारुटोला, कावराबांध, कोटजंभोरा, कोटरा, मानागड, मुंडीपार, पाऊडदौना, पोवारीटोला, सालेकसा, सातगाव येथील ग्रामपंचायतीचा कार्यकाळ यावर्षी संपत असल्यामुळे

सालेकसा : तालुक्यातील कारुटोला, कावराबांध, कोटजंभोरा, कोटरा, मानागड, मुंडीपार, पाऊडदौना, पोवारीटोला, सालेकसा, सातगाव येथील ग्रामपंचायतीचा कार्यकाळ यावर्षी संपत असल्यामुळे ग्रामपंचायत प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. ३४ प्रभागातील ९२ सदस्यांपैकी ७ अनुसूचित जाती, २१ अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीयांसाठी २३, सर्वसाधारणसाठी ४१ जागांचे आरक्षण निश्चित झाले आहे.कारुटोला ग्रामपंचायतची लोकसंख्या ३६५८ आहे. ४ प्रभागातील ११ सदस्यांपैकी अनुसूचित जातीसाठी १ (स्त्री), नामाप्रसाठी २ (स्त्री), सर्वसाधारण स्त्रीसाठी २ जागा राखीव आहेत. कावराबांध ग्रामपंचायतची लोकसंख्या ३३४६ असून ४ प्रभागातील ११ सदस्यांपैकी नामाप्र महिला २, सर्वसाधारण महिलासाठी ४ जागा राखीव आहेत. कोटजंभोरा ग्रामपंचायतची लोकसंख्या ११९१ असून ३ प्रभागातील ७ जागेपैकी अनुसूचित जातीसाठी १, नामाप्र महिलेसाठी १, सर्वसाधारण महिलेसाठी १ जागा आरक्षीत आहेत.कोटरा ग्रामपंचायतीची लोकसंख्या २२२६ असून ३ प्रभागातील ९ जागेपैकी अनुसूचित जमाती स्त्री १, अनुसूचित जमाती स्त्री २, ओबीसी महिला १, सर्वसाधारण महिला १ जागा राखीव आहे. मानागड येथील लोकसंख्या १४७३ असून ३ प्रभागातील ७ जागांपैकी अनुसूचित जमाती स्त्री ३ जागा, ओबीसी महिला महिला १ जागा राखीव आहे. मुंडीपार ग्रामपंचायतची लोकसंख्या ३०७४ असून ४ प्रभागातील ११ जागेपैकी अनुसूचित जाती महिला १, जमाती महिला १, ओबीसी महिला २, सर्वसाधारण महिला २ जागा राखीव आहेत.पाऊलदौना ग्रामपंचायतची लोकसंख्या २५५९ असनू ३ प्रभागातील ९ जागेपैकी अनु. जाती महिला १ जागा, जमाती महिला १ जागा, ओबीसी महिला १, सर्वसाधारण महिला २ जागा राखीव आहेत. पोवारीटोला ग्रामपंचायतची ९२३ लोकसंख्या असून ३ प्रभागातील ७ जागेपैकी अनु. जमाती महिला १, ओबीसी महिला १, सर्वसाधारण महिला २ जागा राखीव आहेत. सालेकसाची ३६९० लोकसंख्या असनू ४ प्रभागातील ११ जागेसाठी अनु. जाती महिला १, जमाती महिला ३, ओबीसी महिला २ जागा राखीव आहेत. सातगाव ग्रामपंचायतची लोकसंख्या २४८२ असून ३ प्रभागातील ९ जागेसाठी अनु. जाती महिला १, अनु. जमाती महिला १, ओबीसी महिला १, सर्वसाधारण महिला २ जागा राखीव आहेत.एकूण ९२ ग्रा.पं. सदस्यांपैकी ५१ महिलासाठी जागा राखीव असून अनुसूचित जातीसाठी ७, अनु. जमातीसाठी १३, ओबीसी १४, सर्वसाधारण १७ जागेवर महिलांसाठी आरक्षण आहे. (तालुका प्रतिनिधी)