शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पर्रीकरांचा सरकारवर वरचष्मा

By admin | Updated: December 9, 2014 00:55 IST

पणजी : मनोहर पर्रीकर केंद्रात संरक्षणमंत्री बनले व लक्ष्मीकांत पार्सेकर मुख्यमंत्री बनले तरी, सरकारवर अजूनही पर्रीकर यांचाच वरचष्मा आहे.

पणजी : मनोहर पर्रीकर केंद्रात संरक्षणमंत्री बनले व लक्ष्मीकांत पार्सेकर मुख्यमंत्री बनले तरी, सरकारवर अजूनही पर्रीकर यांचाच वरचष्मा आहे. अजूनही राज्य मंत्रिमंडळ पर्रीकर यांच्याच प्रभावाखाली असून दर शनिवार-रविवारी गोव्यात मुक्काम करून पर्रीकरच सरकारच्या कारभाराचा गाडा अप्रत्यक्ष पुढे नेत आहेत. काही अधिकाऱ्यांशी खासगीत बोलल्यानंतर सरकारमधील सद्यस्थिती कळून आली. पर्रीकर मुख्यमंत्री होते तेव्हा सरकारमधील किमान चार मंत्री तरी आपल्या फाईलवर पेन्सिलीने नोटिंग लिहीत. पर्रीकर अशा फाईल्स आपल्या टेबलवर ठेवून घ्यायचे. रात्रीच्यावेळी ते ह्या फाईल्स वाचायचे. एखादी फाईल मंजूर करण्यामध्ये व मंत्र्याच्या नोटिंगमध्ये कायदेशीर काही अडचण आहे का हे ते अ‍ॅडव्हकेट जनरलांकडून समजून घेत. पर्रीकरांनी हिरवा कंदील दाखवला किंवा नोटिंगमध्ये सुधारणा केली की मग मंत्र्यांकडून पेनाने नोटिंग लिहिले जात. अर्थात या पद्धतीमागे पर्रीकर यांचा हेतू वाईट नसायचा. मंत्री कोणत्याच अडचणीत येऊ नये, म्हणून पर्रीकरांकडून हे केले जात होते. मात्र, अजूनही राज्य मंत्रिमंडळ पर्रीकरांच्या प्रभावातून बाहेर आलेले नाही, हे स्पष्ट आहे. संरक्षणमंत्री पर्रीकर यांनी गोवा सरकारच्या कामकाजातून व कारभारातून आपले अंग अजूनही काढून घेतलेले नाही. दर शनिवार-रविवारी पर्रीकर येथे आल्यानंतर मुख्यमंत्री पार्सेकर त्यांच्याशी चर्चा करतात. काही मंत्र्यांशीही पर्रीकर चर्चा करतात व कोणते विषय कितपत मार्गी लागले आहेत हे समजून घेतात. मुख्यमंत्री म्हणून पार्सेकर अजूनही पूर्ण स्वतंत्र झालेले नाहीत. काही मंत्रीही शनिवार-रविवार येईपर्यंत व पर्रीकर गोव्यात पोहचेपर्यंत आवडत्या प्रकल्पांचे प्रस्ताव घेऊन थांबतात. (पान ७ वर)