थिवीतील कंत्राटदाराला अपहरण करून लुटले

By Admin | Updated: June 21, 2014 01:44 IST2014-06-21T01:39:54+5:302014-06-21T01:44:22+5:30

बार्देस : धानवा-थिवी येथील अजू सी. एस. या कंत्राटदाराचे शुक्रवारी सकाळी ९.४५ वाजता महाराष्ट्र पासिंगच्या गाडीतून आलेल्या आणि तोंडावर बुरखे घातलेल्या चौघांनी त्याचे अपहरण केले.

Thieves were robbed by the kidnapping of the contractor | थिवीतील कंत्राटदाराला अपहरण करून लुटले

थिवीतील कंत्राटदाराला अपहरण करून लुटले

बार्देस : धानवा-थिवी येथील अजू सी. एस. या कंत्राटदाराचे शुक्रवारी सकाळी ९.४५ वाजता महाराष्ट्र पासिंगच्या गाडीतून आलेल्या आणि तोंडावर बुरखे घातलेल्या चौघांनी त्याचे अपहरण केले. त्यांना नाकोडा-लोटली येथे नेऊन त्यांच्याकडील सोनसाखळी, ४६ हजार रुपयांची रोकड व डोळ्यावर मिरची पावडर मारून धनादेशावर सह्या करून पलायन केल्याची तक्रार
शुक्रवारी म्हापसा पोलिसांत दिली.
याबाबत म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अजू सी. एस. हे आपल्या कारमधून धानवा-थिवीहून येत असताना त्यांच्या समोर महाराष्ट्र पासिंगची गाडी उभी राहिली आणि त्या गाडीतील तोंडावर बुरखे घातलेले चार जण अजू सी. एस. यांच्या गाडीत बसले. त्यांच्याबरोबर आणखीही एक गाडी होती. त्या चौघांनी त्यांच्याच गाडीत बसून त्यांना नाकोडा-लोटली येथे नेले आणि त्यांच्या गळ्यातील २० हजार रुपये किमतीची सोनसाखळी, ४६ हजार रुपयांची रोकड प्रथम काढून घेतली. नंतर त्याच्या डोळ्यांत मिरची पावडर मारून त्यांच्याजवळ असलेल्या धनादेशावर काही सह्या करून घेतल्या. स्टॅम्पही काढून घेतला आणि त्यांना तेथे सोडून पळ काढला. अपहरणकर्ते मोडकी तोडकी हिंदी भाषा बोलत होते. ते दक्षिण महाराष्ट्रातील उंच असे होते, असेही पोलिसांनी सांगितले.
म्हापशाचे पोलीस उपनिरीक्षक रत्नाकर कळंगुटकर यांनी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला असून पुढील तपास करीत आहेत.
(प्रतिनिधी)

Web Title: Thieves were robbed by the kidnapping of the contractor