मंदिर, मैदान, उद्यान एकाच ठिकाणी; खासदार सदानंद तानावडे यांनी केले कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 12:50 IST2026-05-09T12:50:27+5:302026-05-09T12:50:55+5:30

शिरगाळ धारगळ येथे राज्यातील आदर्शवत उपक्रम

temple ground and park in one place bjp mp sadanand tanavade praised | मंदिर, मैदान, उद्यान एकाच ठिकाणी; खासदार सदानंद तानावडे यांनी केले कौतुक

मंदिर, मैदान, उद्यान एकाच ठिकाणी; खासदार सदानंद तानावडे यांनी केले कौतुक

लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे : शिरगाळ धारगळ येथे एकाच ठिकाणी मंदिर, व्हॉलीबॉल मैदान, पदपथ, उद्यान, मुलांसाठी खेळण्यासाठी लागणारे साहित्य उद्यानात उपलब्ध, असे सर्व एकाच ठिकाणी उपलब्ध होणारा गोव्यातील पहिला शिरगाळ धारगळ गाव ठरत आहे, असे उद्‌गार खासदार सदानंद शेट तानावडे यांनी काढले. शिरगाळ येथे धारगळ जिल्हा पंचायत सदस्य श्रीकृष्ण (न्हानू) हरमलकर यांनी स्वखर्चाने हॉलीबॉल मैदान आणि वॉकिंग प्रकल्प उभारला होता. त्याचे लोकार्पण केल्यानंतर खासदार सदानंद शेट तानावडे बोलत होते.

शिरगाळ स्पोर्टस क्लबने आयोजित केलेल्या उ‌द्घाटन सोहळ्याला पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर, मांद्रेचे आमदार जीत आरोलकर, उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष रेश्मा बांदोडकर, धारगळ जिल्हा पंचायत सदस्य न्हानू (श्रीकृष्ण) हरमलकर, तोरसे जिल्हा पंचायत सदस्य राघोबा कांबळी, जिल्हा पंचायत सदस्य वासू सावंत, क्रीडा संचालक डॉ. अजय गावडे, जमीनदार डॉ. वासुदेव देशप्रभू, माजी नगराध्यक्ष उषा नागवेकर, माजी नगराध्यक्ष तृप्ती सावळ देसाई, अनंत अमरे, प्रमोद नाईक, माजी सरपंच वल्लभ वराडकर, पंच अमिता हरमलकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

ज्येष्ठ हॉलीबॉलपटूंचा सत्कार

यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य तुकाराम हरमलकर, जयवंत देसाई, उल्हास वसकर, मनोज सावंत, राजन सावंत, प्रकाश वसकर, तातो अमरे, विलास धारगळकर, सुधाकर हरमलकर, सिद्धू दास हरमलकर, विलास हरमलकर, अरुण हरमलकर, विकास आराबेकर, गजानन नाईक, विनायक नाईक, सत्यवान नाईक, पुंडलिक आरोलकर, मुकुंद राऊळ हनुमंत वराडकर, उल्हास हरमलकर, प्रकाश हरमलकर, राममूर्ती अमरे, श्रीकृष्णा नाईक, रमेश साळगावकर, आत्माराम वसकर, श्रीकांत वसकर, विदेश आंब्रे, निलेश नाईक, अनिल राऊळ, दशरथ वराडकर, गणेश वराडकर, अशोक अमरे, अशोक हळदणकर, दीपक कळंगुटकर आदींचा पाहुण्यांच्या हस्ते शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

जीत आरोलकर यांच्याकडून आठवणींना उजाळा

आमदार जीत आरोलकर यांनी बोलताना शिरगाळ स्पोर्ट्स क्लब मार्फत आम्ही आपल्या क्रीडा क्षेत्राला वाव दिला. यावेळी त्यांनी जिल्हा पंचायत सदस्य न्हानू (श्रीकृष्ण) हरमलकर यांच्या कार्याबद्दल गौरवोद्‌गार काढले. यावेळी आमदार जीत यांनी मैदानाबद्दलच्या आठवणी सांगितल्या. पूर्वी या मैदानावर खेळताना पायांना दगड लागायचे. तरीही आम्ही जिद्दीने खेळत होतो. आता जिल्हा पंचायत सदस्य श्रीकृष्ण हरमलकर यांनी स्वखर्चाने उत्कृष्ट पद्धतीचे मैदान तयार केल्याचे त्यांनी समाधान व्यक्त केले.

जमीनदाराचे कौतुक

आमदार प्रवीण आर्लेकर यांनी शिरगाळ स्पोर्ट्स क्लबच्या कार्याबद्दल गौरवोद्‌गार काढले. तसेच गावच्या, मतदारसंघाच्या विकासासाठी जमीनदाराने यापुढेही सहकार्य करावे, असे आर्लेकर म्हणाले. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य श्रीकृष्ण हरमलकर यांनी शिरगाळवासीयांचे, आमदार जीत आरोलकर, आमदार आर्लेकर, जमीनदार डॉ. वासुदेव देशप्रभू यांचे सहकार्य मिळाल्यामुळे हे मैदान तयार झाल्याचे सांगितले.
 

Web Title : मंदिर, मैदान, उद्यान एक ही स्थान पर; सांसद तावनाडे ने की प्रशंसा।

Web Summary : सांसद सदानंद तावनाडे ने शिरगाओ धारगल की प्रशंसा की, जहाँ एक ही स्थान पर मंदिर, वॉलीबॉल मैदान, उद्यान और बच्चों के खेलने का क्षेत्र है। विधायक जीत आरोलकर ने मैदान पर खेलने की यादें ताजा कीं। विधायक प्रवीण आर्लेकर ने खेल क्लब और जमींदारों के समर्थन की सराहना की।

Web Title : Temple, ground, garden in one place; MP Tavanade praised.

Web Summary : MP Sadanand Tavanade praised Shirgao Dhargal for having a temple, volleyball ground, garden, and children's play area in one place. MLA Jeet Arolkar reminisced about playing on the grounds. MLA Pravin Arlekar lauded the sports club and landowners' support.